
अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी; उपचार सुरू…
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांच्याकडून आज (मंगळवार) पहाटे पाचच्या सुमारास चुकून बंदुकीची गोळी झाडली गेल्याची माहिती समोर आली आहे. स्वत:च्या बंदुकीतून गोळी सुटल्यामुळे गोविंदा जखमी झाला आहे. ही गोळी गोविंदाच्या पायात शिरली. त्यामुळे आता गोविंदा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर क्रीटी केअर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
गोविंदा आज पहाटे पाचच्या सुमारास जुहू येथील घरातून निघणार होता. तेव्हा घरात परवाना असलेली बंदूक तो साफ करत होता. त्यावेळी चुकून गोळी झाडली गेली आणि त्याच्या पायाला लागली. यानंतर त्याला क्रिटी केअर रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार केले जात आहेत. गोविंदाची प्रकृती स्थिर आहे आणि त्याला कोणताही धोका नसल्याचे क्रिटी केअर रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
बंदूक साफ करत असताना अनावधानाने ट्रिगर ओढला गेला. यावेळी बंदुकीतून सुटलेली गोळी पायाला लागली. गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे. जुहू पोलिस अधिक तपास करत आहेत. गोविंदाची पत्नी सुनिता या रुग्णालयात पोहोचल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा यांच्याशी अद्याप कोणतिही चर्चा झालेली नाही, तसेच, घरात ते एकटेच होते. त्यामुळे नेमकं त्यावेळी काय झालं हे अद्याप समजू शकलं नाही. पोलिसांनीही अद्याप जबाब नोंदवलेला नाही. पोलिस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने घेतला घटस्फोटाचा निर्णय…
अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांची आत्महत्या…
अभिनेत्रीचा लैंगिक छळ प्रकरणी दोन अभिनेत्यांविरोधात गुन्हा दाखल…
भाजपच्या मंत्र्याला शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी अभिनेता अटकेत…
प्रसिद्ध अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक…

