सुनेला भेटण्यासाठी तिचा प्रियकर उघडपणे घरी येतो अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : सुनेने विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्यामुळे तिच्या प्रियकराच्या मदतीने सासू आणि सासऱ्याला बेदम मारहाण केली आहे. सासरच्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस कारवाई करत आहेत.

संबंधित घटना चित्रकूटच्या मऊ पोलीस स्टेशन हद्दीतील बिहटा गावची आहे. पीडित सासू सासऱ्यांनी असा आरोप केला आहे की, तिचा मुलगा रवींद्र याचे लग्न आठ वर्षांपूर्वी गीता हिच्याशी झाले होते. मुलगा रवींद्र आणि सुनेला तीन मुले आहेत, माझा मुलगा नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेला असल्याने त्यांच्या सुनेचे एका व्यक्तीशी अनैतिक संबंध निर्माण झाले. नीरज नावाच्या व्यक्तीसोबत गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या सुनेचे प्रेमसंबंध सुरू असून तो उघडपणे आपल्या सुनेला भेटण्यासाठी घरी येतो.

दोन दिवसांपूर्वी नीरज सोबत सून गीता गायब झाली होती. मग जेव्हा ती प्रियकरासोबत पुन्हा घरी आली तेव्हा सासरच्यांनी विरोध केला. सासरच्यांनी या दोघांच्या नात्याला विरोध करताच सूनेन प्रियकरासोबत मिळून सासू सासऱ्यांना मारहाण केली. मारहाणीपासून वाचण्यासाठी सासरच्यांनी पोलिसांना फोन केला आणि सूने विरोधात तक्रार केली. पण, पोलिसांनी त्यांनाच शिवीगाळ करून पळवून लावले आहे. न्याय न मिळाल्याने सासू सासऱ्यांनी आता पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन आरोपी सून आणि तिच्या प्रियकरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लॉकडाऊनमधील प्रेमसंबंधाचा तिहेरी खुनाने झाला शेवट अन्…

प्रेम! मामीने ठोकली भाच्यासोबत धूम अन् पुढे…

प्रेम! भारतीय महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी गाठले पाकिस्तान…

माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…

वहिनीने अनैतीक संबधातून केली दीराची हत्या अन् म्हणाली नवरा नामर्द…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!