घाटंजी पोलिसांचे शहरात पथसंचलन; पांढरकवडा, पारवा पोलिस अधिका-यांची उपस्थिती…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घाटंजी पोलिसांतर्फे घाटंजी शहरात पथसंचलन करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, पांढरकवडा येथील परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक तथा उप विभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी पोलिसांचे पथसंचलन पार पडले. पथसंचलनात घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा […]
अधिक वाचा...पोलिस अधिकारी स्वाती साठे दरडावून म्हणाल्या, संजू, तू बातों से मानेगा या लातों से…
मुंबईः पोलिस अधिकारी स्वाती साठे यांच्या नावाची नुसती चर्चा ऐकून अनेक कुख्यात गुंड आणि डॉन देखील घाबरायचे. स्वच्छ प्रतिमा आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून त्यांनी लौकिक होता. अनेक वर्षे त्यांनी तुरुंग प्रशासनाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात संजय दत्त, शाइनी आहुजा, याकूब मेमन, अजमल कसाब आणि अबू सालेम यांसारख्या मोठ्या गुन्हेगारांनी तुरुंगवास भोगला. एका कणखर आणि धाडसी […]
अधिक वाचा...महिला पोलिसाचा प्रसूतीदरम्यान आकस्मिक मृत्यू, बाळही दगावलं…
रत्नागिरी: रत्नागिरी पोलिस अधिक्षक कार्यालयातील महिला कक्षात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस हेड काँस्टेबलचा प्रसूतीसाठी रुग्णालयात आकस्मिक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. 25) घडली आहे. या दुर्दैवी घटनेत त्यांचे नवजात बाळही दगावले आहे. सांची सुदेश सावंत (वय ३६) असे मृत्यू झालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूमुळे पोलिस दलासह परिसरात हळहळ व्यक्त केली […]
अधिक वाचा...गुन्हे व मुद्देमाल निर्गतीत यवतमाळ जिल्ह्यात अव्वल स्थानी…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी पोलिस स्टेशनने गेल्या काही महिन्यांपासून गुन्हे व मुद्देमाल निर्गतीच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केली असून, “CCTNS डेटा फीडिंग” मध्ये घाटंजी पोलिस स्टेशन दुय्यम क्रमांक पटकावला आहे. तसेच जून महिन्यातील मासिक गुन्हे सभेत त्यांनी विशेष कामगिरीच्या जोरावर गुन्हे निर्गतीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात तिसरा तर मुद्देमाल निर्गतीमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित […]
अधिक वाचा...पुणे वाहतूक शाखेतील पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या…
पुणे: पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलिस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. ते पुणे शहर वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. राजेंद्र गायकवाड यांना शनिवारी (ता. १९) साप्ताहिक सुट्टी असल्याने ते घरीच होते. […]
अधिक वाचा...पुणे शहरातील पोलिसकाकाचा कर्तव्य बजावताना हृदयविकाराने निधन…
पुणे: पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलिस नाईक धनाजी भरत वणवे (वय 42) यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कात्रज मंडई चौकात बुधवारी (ता 10) सायंकाळी 6.45 वाजता घटना घडली. त्यांच्या निधनामुळे पुणे पोलिस दलात शोककळा पसरली आहे. पोलिस नाईक धनाजी वणवे नेहमीप्रमाणे वाहतूक नियमनासाठी कात्रज मंडई चौकात तैनात होते. अचानक त्यांना चक्कर […]
अधिक वाचा...राज्यातील अनेक परिविक्षाधीन आयपीएस (IPS) अधिका-यांच्या बदल्या..
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : राज्यातील अनेक परिविक्षाधीन आयपीएस (IPS) अधिका-यांच्या बदल्या गृह विभागाने केल्या असून पांढरकवडा येथे परिविक्षाधीन (IPS) राॅबीन बन्सल यांची उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. जिल्हा प्रात्यक्षिक प्रशिक्षण (DTP) व सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैद्राबाद येथील प्रशिक्षण पूर्ण करुन महाराष्ट्र संवर्गात रुजू होणाऱ्या खालील तक्त्यातील संदर्भ […]
अधिक वाचा...मिरा भाईंदर पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी…
मुंबई : मिरा भाईंदर पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या जागी IPS अधिकारी निकेत कौशिक यांची मिरा भाईंदर- वसई विरार पोलिस आयुक्तपदी वर्णी लावण्यात आलेली आहे. मिरा भाईंदरमध्ये मराठी अमराठी वाद पेटलेला असताना व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मराठी मोर्चा काढण्याचे ठरलेले होते. मात्र मनसे, शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला मिरा […]
अधिक वाचा...महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…
मुंबई: महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खांदेपालट झाली असून, पोलिस उपआयुक्त दर्जाच्या २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुण्याच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांची पदोन्नती झाली आहे. गणेश इंगळे यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स याठिकाणी पोलिस उपायुक्त म्हणून पदोन्नती झाली. तर विजय […]
अधिक वाचा...पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या…
पुणे : पुणे पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. स्वरुप जाधव असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील स्वारगेट येथील पोलिस लाईनमध्ये स्वरुप जाधव हे राहत होते. राहत्या घरात गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली आहे. […]
अधिक वाचा...
