महावितरणचा हलगर्जीपणामळे पती-पत्नीचा जागीच मृ्त्यू…
गोंदिया: विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी पती–पत्नीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम घाटबोरी/कोहळी येथे ही घटना घडली आहे. पती-पत्नीचा मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ग्राम कोदामेडी ते शिंदिपार मार्गावरील आपल्या शेतात काम करण्यासाठी दोन भाऊ व त्यांची पत्नी असे चार जण […]
अधिक वाचा...शिक्षक कारचे पेढे वाटण्यासाठी गेले अन् कार कोसळली विहिरीत…
सोलापूर : नवीन घेतलेल्या कारचे पेढे वाटण्यासाठी मेव्हण्याकडे गेलेल्या शिक्षकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार विहिरीमध्ये कोसळून मृत्यू झाला आहे. इराण्णा झुजगार असे या शिक्षकाचं नाव आहे. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील शिक्षक ईरन्ना बसप्पा जूजगार यांनी पाच दिवसांपूर्वी कार खरेदी केली होती. कारचे पेढे वाटण्यासाठी ते मेव्हण्याच्या गावी गेले. कार सावलीत […]
अधिक वाचा...पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, तीन ठार…
पुणेः पुणे-बंगळुरु महामार्गावर बुधवारी (ता. १३) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे-बंगळुरु महामार्गावरील खंडाळा येथील धनगरवाडी हद्दीत पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गांवर हा अपघात झाला. पंक्चर झालेल्या ट्रकला मागून येऊन दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची […]
अधिक वाचा...विवाहित महिलेने त्रासाला कंटाळून घेतला जगाचा निरोप…
रायगड : एका विवाहित महिलेला होत असलेली सततची मारहाण आणि हुंड्याच्या मागणीला कंटाळून तिने आत्महत्या केल्यीच धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्रणाली विनायक ठाकूर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी वडखळ पोलिस ठाण्यात मृत प्रणाली विनायक ठाकूर यांच्या भावाने फिर्याद दिली आहे. फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणाली […]
अधिक वाचा...घरात हीटर लावताच विजेच्या धक्क्याने महिलेचा जागीच मृत्यू…
औरंगाबाद : घरात लावलेल्या हीटरमुळे एका विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सिल्लोडच्या रेलगाव येथे घडली आली आहे. स्वाती विष्णू काजले (वय 23) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. सिल्लोडच्या रेलगाव येथील स्वाती काजले या शुक्रवारी सायंकाळी घरात पाणी गरम करण्यासाठी हीटर लावत होत्या. यावेळी स्वाती यांना हीटरचा शॉक लागला. यात त्या दूरवर फेकल्या गेल्या. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! माहेरवरून परतताना आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू…
बीड : रिक्षा आणि कंटेनरच्या अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर बकरवाडी फाट्याजवळ घडली आहे. माहेरवरून रिक्षाने परत येत असलेल्या या महिलेवर आणि तिच्या मुलांवर काळाने घाला घातला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. धारूर तालुक्यातील थेटे गव्हाण येथून बीडकडे येत असणाऱ्या रिक्षाला बीडवरून परळी कडे […]
अधिक वाचा...गो तस्करांच्या हल्ल्यात पोलिस कर्मचारी जखमी…
पालघर: वडवली (ता. वाडा) या गावात गोवंश जातीची पाच जनावरं क्रूरपणे डांबून ठेवण्यात आल्याची खबर गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि वाडा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी गो तस्करांवर धाड टाकल्यानंतर गो तस्करांनी पोलिसांवर हल्ला चढवला. यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 8) पहाटेच्या सुमारास घडली. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस शिपाई सचिन भोये […]
अधिक वाचा...हृदयद्रावक Video: वडिलांच्या मिठीतच सोडला प्राण…
लखनौ (उत्तर प्रदेश): गाझियाबादमधील एका 14 वर्षांच्या मुलाला कुत्रा चावला होता. पण, घरच्यांपासून त्याने ही बाब लपवली होती. मुलाचा रेबिजमुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याने वडिलांच्याच मिठीत प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलाला दीड महिन्यांपूर्वी शेजाऱ्याचा कुत्रा चावला होता. पण, आई-वडिलांच्या भीतीमुळे मुलाने ही गोष्ट घरी सांगितली […]
अधिक वाचा...धक्कादायक! भालाफेकीचा सराव करताना भाला डोक्यात घुसून विद्यार्थ्याचा मृत्यू…
रायगड : भालाफेकीचा सराव करत असताना डोक्याला भाला लागून शालेय विद्यार्थाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रायगडमध्ये घडली आहे. माणगांवच्या वणी येथील शाळेतील हा प्रकार समोर आला आहे. वणी येथील आयएनटी ॲकेडमी इंग्लिश स्कूल ॲण्ड हायस्कूलमध्ये ही घडली घटना घडली आहे. भालाफेकीचा सराव करताना भाला थेट हुजाईफा दावरे या विद्यार्थ्याच्या डोक्यात घुसला आणि त्याचा जागीच मृत्यू […]
अधिक वाचा...इंटरशिप करत असलेल्या डॉक्टरने घेतला जगाचा निरोप…
गोंदिया : शासकीय महाविद्यालयातील शिकावू डॉक्टर भूषण विशाल वाढोणकर (वय २४) याने वस्तीगृहातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटरशिप करत असलेला भूषण विशाल वाढोणकर (वय 24 वर्ष, रेल्वे चांदूर अमरावती जिल्हा येथे राहणारा) हा विद्यार्थी गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या […]
अधिक वाचा...
