Video: नाशिकमध्ये गुंडाचा झेरॉक्स दुकानावर तलवारीने हल्ला; युवती जागेवर बेशुद्ध…
नाशिक : नाशिक शहरात हातात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणारा गुंड सीसीटीव्हीत कैद झाला आहे. इंदिरा नगरमधील साईबाबा मंदिर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इंदिरा नगरमधील साईबाबा मंदिर परिसरात गुंडाकडून हातात तलावर घेऊन झेरॉक्स दुकानावर हल्ला करण्यात आला आहे. अचानक घडलेला हा सर्व प्रकार पाहून या दुकानात उभी […]
अधिक वाचा...आपण यांना ओळखता का? बक्षिस देण्यात येईल…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील बिबवेवाडी पोलिस स्टेशन हद्दीत एक महिला मृतावस्थेत आढळली आहे. संबंधित महिलेबाबत आपणास माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ०९/१२/२०२३ रोजी १०.४० वा चे पुर्वी पासलकर चौक ते गंगाधाम चौक हया दुहेरी वाहतुकीचे रोडचे पश्चिम बाजुस गोयल गार्डनसमोर रोडचे कडेला असणारे जय संतोषी मॉ आयुर्वेदिक कॅम्प, बिबवेवाडी, पुणे या […]
अधिक वाचा...शिक्षक बनवायचा अश्लील व्हिडिओ, पत्नीनेच केला भांडाफोड…
बीड : एका शिक्षकाने शाळेतील एका महिला शिक्षकासोबत अश्लील व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बीड शहरातील मिलिया माध्यमिक शाळेतून हा प्रकार समोर आला आहे. आमेर काझी असे संबंधित शिक्षकाचे नाव असून, या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आरोपी आमेर काझी विरोधात बीड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
अधिक वाचा...पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू…
पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर मंचर बायपासवर आज (शुक्रवार) सकाळी टेम्पो आणि क्रुझरमध्ये झालेल्या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. तीन जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात तर दोन जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर मंचर बायपासला हा भीषण अपघात झाला आहे. पुढे चाललेल्या टेम्पोला क्रुझर गाडीने पाठीमागच्या बाजूने […]
अधिक वाचा...सातारा येथे दोन डीजे व्यवसायिकांमध्ये खुन्नस; गुन्हा दाखल…
सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गौरीशंकर कॉलेजच्या परिसरात दोन डीजे व्यवसायिकांमध्ये खुन्नस पाहायला मिळाली. दोन डॉब्लीच्या आवाजामुळे परिसर दणाणून गेला होता. शिवाय, तलवारी आणि कोयते नाचवले होते. या प्रकरणी तीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सात जणांना अटक करण्यात आली आहे. सातारा येथील पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर गौरीशंकर कॉलेजच्या परिसरात 2 डॉल्बी व्यवसायिकांमध्ये डॉल्बीच्या आवाजाची […]
अधिक वाचा...मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला धमकीचा फोन…
मुंबईः मुंबई पोलिसांना मंगळवारी (ता. २१) रात्री पुन्हा एकदा धमकीचा फोन आला असून, मुंबईत मोठा घातपात होणार असल्याची फोनवरुन माहिती दिली आहे. दक्षिण मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. एका व्यक्तीने फोनवर माहिती दिली की, ‘मुंबईत मोठा कांड होणार आहे’. मुंबई पोलिसांना यापूर्वीही असे धमकीचे फोन आले होते, यावेळी 26/11 हल्ल्याची […]
अधिक वाचा...Video: पिरंगुट घाटात भरधाव टेम्पोने अनेकांना चिरडले…
पुणे : पिरंगुट (ता. मुळशी) घाटात भरधाव टेम्पोने अनेक वाहनांना धडक देत अनेकांना चिरडल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. कोलाड-पुणे महामार्गावर पिरंगुट घाटात भीषण अपघात झाला आहे. तीव्र उतारावर एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने अनेक वाहनांना उडविले. या घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर दोन दिवस ब्लॉक…
पुणे : समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन आणि अति उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार असून, या कामांसाठी समृद्धी महामार्ग आज (मंगळवार) आणि उद्या बारा ते चार या वेळेत वाहतुकीसाठी बंद असणार आहे. जालना ते छत्रपती संभाजीनगरदरम्याची वाहतूक या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन आणि अति उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर काळाचा घाला; युवक ठार, तिघे गंभीर…
वाशिम : समृद्धी महामार्गावर शनिवारी (ता. ११) मध्यरात्री वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या कारंजा टोलनाक्याजवळ कारला भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवाळीनिमित्त पुण्याहून वर्ध्याला गावी ४ युवक निघाले होते. समृद्धी महामार्गावरून जात असताना वाशिमच्या कारंजा टोल नाक्याजवळ नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या […]
अधिक वाचा...Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…
पुणे : पुणे बंगळुरू महामार्गावर शुक्रवारी (ता. १०) मध्यरात्री तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका भरधाव कंटेनरने लक्झरी बस, टेम्पो आणि कारला धडक दिली. धडकेनंतर कंटेनर रस्त्यावर उलटला. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. जखमींचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर […]
अधिक वाचा...
