पाचगणीमध्ये रिसॉर्टवर पोलिसांचा छापा; बारबालांसह 48 जण ताब्यात…

सातारा : पाचगणीच्या खिंगर येथील ‘पाचगणी टेन्ट हाऊस’ रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकला आणि दहा ते बारा बारबालांसह 48 जणांना रविवारी (ता. १८) रात्री ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पाचगणी खिंगर येथील पाचगणी टेन्ट हाऊस हॉटेलवर बारबाला नाचवल्या प्रकरणी दहा ते बारा मुलींसह 48 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई झाली ते सर्व सोलापूर जिल्ह्यातील खते, औषधे आणि बी, बियाणेचे विक्रेते व डीलर असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांची धाड पडल्याचे लक्षात येताच काही संशयीत तसेच बारबालांसह डान्स करणारे पाच ते सहा जण घटनास्थळावर अलिशान गाड्या तशाच सोडून पळून गेले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख व ॲडिशनल एस पी आंचल दलाल यांनी या पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टवर छापा टाकून ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टचा मालक डॉक्टर विजय दिघे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, दोन महिन्यापूर्वी देखील पाचगणी येथीलच कासवंड येथे स्प्रिंग व्हॅली या रिसॉर्टवर अशाच प्रकारची घटना घडली होती. यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पाच डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पाचगणी येथील पाचगणी टेन्ट हाऊस या रिसॉर्टवर कारवाई केली आहे.

मुंबईत पॉर्न फिल्मचे शूटिंग सुरु असताना पोलिसांनी टाकली धाड…

प्राध्यापकाच्या बंगल्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; परदेशी युवतीसह…

हॉटेलवर रात्रीच्या सुमारास छापा अन् बारबालांसह एकच पळापळ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!