धक्कादायक Video: लोणावळा येथील भुशी डॅमवर कुटुंब गेलं वाहून…

पुणे : पुणे शहरातील अन्सारी कुटुंब वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमवर आले होते. भुशी धरण परिसरात असलेल्या रेल्वे वॉटर फॉलवर पर्यटनाचा आनंद घेताना त्यांचा तोल जाऊन ते धबधब्यात पडले. सर्वांनी एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या शक्तीसमोर त्यांचा टीकाव लागू शकला नाही. आणि एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले. त्यातील तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पालखी दरम्यान वाहतूकीत बदल; पाहा पर्यायी मार्ग…

पुणे : श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रविवार (ता. ३०) पुणे शहरात आगमन होणार असून मुक्कामही असणार आहे. या सोहळ्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते रविवारी दुपारनंतर आवश्‍यकतेनुसार वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड इथून रविवारी […]

अधिक वाचा...

पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक!

मुंबईः पाकिस्तानमधून सहिसलामत परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाल्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानने तब्बल ३ महिने २१ दिवस त्यांचा छळ केला होता. भारत सरकारने मोठे प्रयत्न केल्यानंतर त्यांची सुटका झाली होती. संपूर्ण देशाने त्यांच्या सुटकेनंतर आनंदोत्सव साजरा केला […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पालखी सोहळ्यासाठी पाच हजार पोलिस तैनात…

पुणे: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (ता. ३०) पुणे शहरात दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी वारकरी, तसेच भाविकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सुमारे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी सीसीटीव्ही, वॉच टॉवर राहणार असून गर्दीच्या ठिकाणी गुन्हे शाखेची खास पथके गस्त […]

अधिक वाचा...

बारामतीत बैलावरून वाद! गोळीबारातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू…

बारामती : बारामती तालुक्यात शर्यतीचा बैल खरेदीकरण्याच्या वादातून निंबुत येथे गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू होती. मात्र, उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. बारामतीच्या निंबुत गावात गोळीबार झाल्याची […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू…

जालना : जालन्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावरील कडवंची जवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीगा कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर […]

अधिक वाचा...

‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमची आत्महत्या…

सांगली: सांगलीतील युवा पैलवान सूरज निकम याने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सूरज निकम हा ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ पैलवान होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सूरज निकमच्या आत्महत्येमुळे सांगलीतील कुस्ती क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पैलवान सूरज […]

अधिक वाचा...

पुणे पोर्श अपघात प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं ए टू झेड…

मुंबई: पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरणाबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) विधानसभेत निवेदन दिले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात पोर्शे कार अपघात प्रकरण आणि पुणे ड्रग्जप्रकरणावरुन आज सभागृहात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलावर काही अपवाद वगळता योग्यप्रकारे कारवाई केल्याचा दावा […]

अधिक वाचा...

आईस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाचे गूढ उकललं…

मुंबई : मुंबईतील मालाड परिसरात एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. पण, आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील फॉर्च्यून डेअरी या कंपनीतील कामगाराचेच असल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. तसा अहवाल गुरुवारी न्यायवैद्यक प्रयोगशाळेने मालाड पोलिसांना दिला आहे. ही घटना घडल्यानंतर इंदापूर येथील फॉर्च्युन डेअरीला उत्पादन बंद करण्याचे आदेश […]

अधिक वाचा...

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

नागपूरः नागपूरच्या कपिल नगर पोलिस स्टेशन हद्दीत चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीचीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन वर्षांपूर्वी या जोडप्याचा प्रेमविवाह झाला होता. मन्नत कौर विर्क असे मृत पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दिलप्रीत सिंग विर्क याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिलप्रीत विर्क आणि मृत मन्नत कौर यांचा 2022 […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!