१४ वर्षांपूर्वी पोलिस गोळीबारात मुलगा मृत्यूमुखी पडलेल्या ठिकाणीच पित्याची आत्महत्या…
अहमदाबाद: गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील थांगड पोलीस गोळीबार घटनेत २०१२ मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी, ज्या परिसरात त्यांचा मुलगा पंकज सुमरा (वय १६) पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला होता, त्याच परिसरात अमरशीभाई सुमरा (वय ५३) यांनी धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. गेल्या १४ वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या एका हताश पित्याने त्याच परिसरात आपले जीवन […]
अधिक वाचा...परवाना निलंबित, मालकाला तुरुंगवास… तरीही फटाक्यांचा कारखाना सुरूच; कौशांबीमधील ११ मृत्यूंसाठी जबाबदार कोण?
प्रयागराजः कौशांबीच्या पिपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून फटाक्यांचा एक बेकायदा कारखाना सुरू होता. कारखान्याला लागून असलेल्या घरावर दारूगोळ्याचा ढिगारा होता. फटाक्यांच्या निर्मितीसोबतच, त्यांची मोठ्या प्रमाणावर साठवणूक आणि विक्रीही केली जात होती. गावातील बेकायदेशीर कारखाना, गोदाम आणि अवैध कारवायांकडे पोलिस आणि प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत राहिले. सोमवारच्या स्फोटात ११ जणांचा बळी गेल्यानंतरच जबाबदार अधिकारी […]
अधिक वाचा...भोंदूबाबाने पतीला बाहेर पाठवलं अन् पत्नीसोबत नको ते केलं…
चंद्रपूर : ग्रहशांती आणि कालसर्पदोष निवारणाच्या नावाने एका भोंदू बाबाने विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलिस स्टेशन अंतर्गत उघडकीस आली आहे. याप्रकरणी भीसी पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम खंगार याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. पीडित महिलेच्या (वय २७) पतीची प्रकृती वारंवार बिघडत असल्यामुळे त्यांनी शुभम महाराजासोबत पूजेसाठी संपर्क केला. […]
अधिक वाचा...अकोल्यात विश्वासू हमालानेच मालकाला बांधून लुटले ५४ लाख…
अकोलाः सुमारे पाच वर्षांपूर्वी कामावर ठेवलेल्या एका हमालांनीच विश्वासघात करून दरोडा घातला. वरच्या मजल्यावर असलेल्या घरातून खाली दुकानात कामगारांना सूचना देण्यासाठी येण्याच्या तयारीत असतानाच, या हमालांनी घरात घुसून मालकाचे हात-पाय बांधले आणि सुमारे ५० लाख रुपये किंमतीचे दागिने आणि ४ लाख रुपये रोख रुपये लुटून पलायन केले. दरोड्याच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अकोल्यातील […]
अधिक वाचा...चिंतामणी’च्या आगमन सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ
मुंबईः चिंचपोकळी चिंतामणी गणपतीच्या आगमन मिरवणुकीसाठी शनिवारी जमलेल्या प्रचंड गर्दीचा चोरट्यांनी गैरफायदा घेतला. या गर्दीत अनेक भाविकांचे सोन्याचे दागिने आणि महागडे मोबाईल फोन चोरीला गेले आहेत. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत करी रोड येथील ज्योती निखिल राणे या आपल्या बहिणीसोबत गणपतीच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी लालबाग परिसरात […]
अधिक वाचा...महापौरांचा पती असल्याचे भासवून शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल…
मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा पती असल्याचा दावा करत, एका फोटोग्राफी शिक्षकाच्या छायाचित्राचा गैरवापर करून, युट्यूबवर टाकून बदनामी केल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. शिक्षक राजेश वासुदेव तावडे यांना २६ ऑगस्ट रोजी या व्हीडिओची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. २३ ऑगस्टला प्रसारित करण्यात आलेल्या या व्हिडीओद्वारे आपली बदनामी करण्याचा प्रयत्न […]
अधिक वाचा...मुंबई पोलिसांच्या घोडदळ पथकासाठी १.२७ कोटींचा निधी; ३८ पोलिसांचे पथक तयार…
मुंबईः शहराच्या कायदा व सुव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने, मुंबई पोलिसांच्या विशेष ‘माऊंटेड पोलिस युनिट’ (घोडदळ पथक) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी १.२७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या उपक्रमाची सुरवात २८ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयाने झाली होती, त्यात ३० घोड्यांचा समावेश असलेले घोडदळ पथका स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात […]
अधिक वाचा...बालिकेवर लैंगिक अत्याचार; दिल्लीत टॅक्सी चालकाला अटक
नवी दिल्लीः दिल्लीच्या बवाना येथे एका खासगी शाळेतील नर्सरीत जाणाऱ्या बालिकेला, चॉकलेटचे अमिष दाखवून तिला अयोग्यरित्या स्पर्श करून लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी शाळेत काम करणाऱ्या एका टॅक्सी चालकाला अटक केली आहे. बालिकेच्या वागण्यात बदल झाल्याचे लक्षात आल्यानंतर, तिच्या आईने विचारल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्या मुलीने तिच्या आईला शाळेतील एका ‘वाईट काका’बद्दल सांगितले. […]
अधिक वाचा...अंकित बलियान हत्या प्रकरणी उत्तर प्रदेशात एन्काउंटर; दोन मुख्य मारेकरी ठार
शामलीः उत्तर प्रदेश पोलिस आणि विशेष कृती दलाने (एसटीएफ) हरियाणातील गायक आणि अभिनेता अंकित बलियान यांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या दोन मुख्य मारेकऱ्यांना ठार केले. ही चकमक सोमवारी पहाटे शामलीतील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. पोलीस अधीक्षक (एसपी) एन. पी. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलियान हत्याकांडातील मुख्य मारेकरी शामलीच्या दिशेने जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना पहाटे […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करून दिल्लीत फेकून दिले…
नोएडाः उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील अकरावीत शिकणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीवर धावत्या स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची एक भीषण घटना घडली आहे. कौटुंबिक वादानंतर नोएडामधील आपल्या चुलत भावाच्या घरी जात असलेली ही पीडित मुलगी, रस्त्यात एकटी उभी असताना बस चालक आणि वाहकाने तिला लक्ष्य केले. दिल्ली आणि एनसीआर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालक कुलदीप आणि […]
अधिक वाचा...
