मुंबई! पोलिसकाकाला वर्षाचा शेवटचा दिवस ठरला जीवघेणा…
मुंबईः एका पोलिस कर्मचाऱ्याचा लोकलमधून प्रवास करत असताना रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. देविदास सस्ते (वय ४४) असे मृत पावलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते ड्युटी करून घरी जात असताना ही घटना घडली. या घटनेमुळे मुंबई पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. वर्षाचा शेवटचा दिवस त्यांच्यासाठी आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला आहे. देविदास सस्ते मूळचे […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आई, बाबा आज तुमची खूप आठवण येत आहे. लवकर या…
नांदेड : किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड परिसरातील एका महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई-वडिलांची तीव्र ओढ आणि मानसिक अस्वस्थता यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रानोजी विलास ऐनवलेवाड (वय 20) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो नांदेड येथे बी. एस्सी. […]
अधिक वाचा...जळगाव! लव्ह ट्रँगलमधून युवकाची हत्या; पोलिसाने पाहिले अन् जागेवरच पकडले…
जळगाव: एका युवतीसोबत असलेल्या मैत्रीच्या वादातून इंजिनिअरींगचं शिक्षण घेणाऱ्या युवकाचा सिनेस्टाईल पाठलाग करून गोलाणी मार्केट परिसरात बुधवारी दुपारी खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. साई गणेश बोराडे (उर्फ जय गोराडे, रा. दशरथनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी शुभम रवींद्र सोनवणे याला शहर पोलिसांनी अटक केली […]
अधिक वाचा...पुणे बॉम्ब स्फोटातील जामिनावरील आरोपीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या…
अहिल्यानगर : श्रीरामपूर येथे दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात आरोपींनी अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर याच्यावर भरदिवसा गोळ्या झाडल्या. यानंतर तातडीने जहागिरदारला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान जहागिरदारचा मृत्यू झाला आहे. पुण्यात झालेल्या जर्मन बेकरी साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना मदत केल्याचा बंटी जहागिरदार याच्यावर आरोप होता. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी जहागिरदार याच्यावर गोळ्या झाडल्या. […]
अधिक वाचा...पुणे शहरातील २०२५ मधील गुन्हेगारी वास्तव आणि पोलिस आयुक्तांचे धडाकेबाज निर्णय…
(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर गेल्या काही वर्षांत वेगाने विस्तारत आहे. मात्र २०२५ हे वर्ष पुण्यासाठी केवळ विकासाचे नव्हे, तर गुन्हेगारीच्या दृष्टीने चिंताजनक होते. पण, पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतलेले धडाकेबाज निर्णय आणि कारवायांमुळे गुन्हेगारी क्षेत्राला आळा बसला… पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, संघटित […]
अधिक वाचा...पुणे! थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद पाहा…
पुणे: पुणे शहराच्या अनेक भागात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठा जल्लोष साजरा केला जातो. लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन आज (३१ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजल्यानंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त […]
अधिक वाचा...पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दरोडेखोरांचे आव्हान स्विकारले अन्…
पुणे: सिंहगडच्या पायथ्याला असलेल्या खानापूर गावातील सराफ दुकानावर दिवसा सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला ४८ तासांत जेरबंद करण्यात पुणे ग्रामीणच्या पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सुमारे ५६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने किं.रू. ७०,३२,०००/- चा मुद्देमाल केला हस्तगत केला आहे. पुणे ग्रामीणची स्थानिक गुन्हे शाखा, हवेली पोलिस स्टेशन, वेल्हे पोलिस स्टेशनने ही कामगिरी केली आहे. […]
अधिक वाचा...प्रसिद्ध अभिनेत्रीने मालिकेतील पात्राप्रमाणेच उचललं मोठं पाऊल…
बंगळूरू : कन्नड आणि तमिळ प्रसिद्ध अभिनेत्री नंदिनी सीएम हिने बंगळूरमधील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. आई वडिलांना उद्देशून लिहिलेल्या एका चिठ्ठीत, तिच्यावर लग्नासाठी दबाव आणला जात होता आणि ती त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हती, असं म्हटलं आहे. तसेच, इतर काही कारणांमुळे देखील ती नैराश्यात होती, असा उल्लेखही त्यात आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध […]
अधिक वाचा...धक्कादायक! संशयावरून पत्नी आणि चिमुकल्याची झोपेतच सपासप वार करत हत्या…
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि चिमुकल्याची कुऱ्हाडीने सपासप वार करत हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांचा जीव गेल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. राहुल हरी म्हस्के (वय ३५) याने चारित्र्याच्या संशयावरून गाढ झोपेत असलेली पत्नी रूपाली (वय ३०) आणि मुलगा रियांश (वय ४) यांच्यावर कुऱ्हाडीने […]
अधिक वाचा...राजधानीत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये होतेय वाढ…
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज शेकडो प्रकरणांमध्ये मुली घरातून पळून जाणे, गायब होणे किंवा अपहरण झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या जात आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांच अंतर्गत अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिट (AHTU) कार्यरत आहे. मात्र अलीकडच्या काळात समोर येणाऱ्या घटनांनी पोलिसांनाही धक्का बसला […]
अधिक वाचा...
