पुणे शहरात मौजमजेसाठी घरफोडी व स्पोर्ट बाईक चोरणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात मौजमजेसाठी घरफोडी व स्पोर्ट बाईक चोरी करणारा सराईत आरोपीकडून ६ घरफोडया व ४ मोटार सायकल जप्त करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोंढवा पोलिस ठाणे पुणे येथे प्रतीभा हौसिंग सोसायटी येथे एका इमारतीमध्ये ४ फ्लॅट ३ अनोळखी आरोपींनी फोडल्याबाबत गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर व पोलिस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, व त्यांचे पथक आरोपी यांचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेत असताना सदर गुन्हा हा आरोपी समीर उर्फ अल्फाज हनिफभाई शेख (वय १८ वर्षे, २ महिने, रा. सैय्यदनगर, ग.न.२३, हडपसर, पुणे) व महया उर्फ महेश काशिनाथ चव्हाण (वय १९ वर्षे, रा. गाडी तळ हडपसर पुणे) व विधी. बालक यांनी केल्याचे पोलिस अंमलदार राहुल थोरात, विकास मरगळे यांनी उघड केले होते.

सदर आरोपी पैकी समीर उर्फ अल्फाज हनिफभाई शेख यास १४/११/२०२४ रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून त्यावेळी १० हजार रुपये किं एक होंन्डा कंपनीची डिओ मोटार सायकल जप्त करुन हडपसर पोलिस ठाणे कडील गुरन. १७१६/२०२४, भादवि कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा उघड करण्यात आला होता. नमुद गुन्हयात महया उर्फ महेश काशिनाथ चव्हाण, हा फरार झाला होता. फरार कालावधीमध्ये त्याने विश्रांतवाडी पोलिस ठाणे हद्दीत गुन्हा केल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक होवुन येरवडा कारागृह येथे जमा करण्यात आले होते. नमुद आरोपी याने कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले असल्याबाबतची गुप्त माहिती पोलिस अंमलदार अभिजीत जाधव, गणेश चिंचकर, अक्षय शेडगे यांना प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने आरोपी याच्याकडे तपास करुन असल्याने न्यायालयाकडुन परवानगी घेवून ताबा घेण्यात आला होता. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्याने
१) प्रतिभा हौसिंग सोसायटी,फेज- १. आय.सी.आय.सी.आय. बॅक शेजारी,
२) अर्जुन मुक्ताई बिल्डींग, कोंढवा हॉस्पीटलजवळ येवलेवाडी पुणे,
३) फलॅट नं.१०७, वसंतलता अर्पा. ग.०१, गोकुळनगर शिव पार्वती मंगल कार्यालय शेजारी कोंढवा बुा पुणे
४) नताशा हिल व्हिव सोसायटी, फलॅट नं. १०३, पहिला मजला, कोंढवा खुा पुणे,
५) परफेक्ट मेडिकल शॉप, गाळा नं. डी२ / ४, सनश्री डी बिल्डींग, एनआयबीएम रोड कोंढवा खुा पुणे
६) फलॅट नं. १०१, स्वप्नपुर्ती निवास, श्रीनाथ पार्क दिल्ली पब्लिक स्कुल, महम्मदवाडी, कोंढवा पुणे येथे घरफोडीचे ६ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडुन सदर घरफोडी चोरीतील सोन्याचे दागिणे रोख रक्कम असा एकुण १,३१,६४०/- रु कि मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सदर आरोपी यांच्याकडुन चोरीच्या दोन अॅक्सिस व दोन यमाहा आर – १५ अश्या चार मोटार सायकल एकुण किंमत ३,०९,७९६/- रु कि जप्त केल्या आहेत. आरोपी याच्याकडुन पुढीलप्रमाणे गुन्हे उघड झाले आहे.
१) पिपंरी पोलिस ठाणे येथे गुरन. ८५३ / २०२४ भा.न्या. संहिता. ३०३(२),
२) हडपसर पोलिस ठाणेस गुरन. १६५५ / २०२४ भान्यासंहिता.३०३(२),
३)भारती विदयापीठ पोलिस ठाणे पुणे येथे गुरन. १०१७ / २०२४ भान्या संहिता. ३०३ (२),
४) कोंढवा पोलिस ठाणेस गुरन. ९०५ / २०२४ भा.न्या. सहिता. ३०५ (अ),३३१(३),३३१(४).
५) कोंढवा पोलिस ठाणेस गुरन. १०५/२०२४ भा. द. वि. ३८०, ४५४,४५७.
६) कोंढवा पोलिस ठाणेस गुरन. ९५४ / २०२४ भा. न्या. सहिता. ३०५, ३३१ (४).
७) कोंढवा पोलिस ठाणेस गुरन. २४२ / २०२४ भादवि. कलम.३८०.
८) कोढवा पोलिस ठाणेस गुरन ५७५/२०२४ भादवि. कलम ३७९.
९) कोढवा पोलिस ठाणेस गुरन. ९५५/२०२४, भा. न्या. सहिता. कलम ३३१(४),३०५
१०) कोंढवा पोलिस ठाणे पुणे गुरन. १२४८/२०२४, भा. न्या. संहिता कलम.३३१(३),३३१(४),३०५(ए).

संबंधित कामगिरी ही पोलिस आयुक्त अमितेशकुमार, रंजन शर्मा, सह पोलिस आयुक्त, मनोज पाटील, पुर्वे प्रादेशिक विभाग, राजकुमार शिंदे, पोलिस उप आयुक्त सो परि.०५, धंन्यकुमार गोडसे, सहा.पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, विनय पाटणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, अंमलदार अमोल हिरवे, अभिजीत जाधव, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, राहुल थोरात, राहुल रासगे, विकास मरगळे, मयुर मोरे, अक्षय शेंडगे यांनी केली आहे.

कोंढवा पोलिस ठाणे तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी; २० दुचाकी जप्त…

कोंढवा पोलिसांनी अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह मुद्देमाल केला जप्त…

कोंढवा पोलिस स्टेशनच्या तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी…

कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पाहा दुचाकींचे क्रमांक…

कोंढवा पोलिसांनी रिक्षा चोरणा-या सराईत चोरट्यास केली अटक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!