
हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…
मुंबई : मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल फेरीबोटीला एक सुसाट स्पीड बोटीने धडक दिली. या अपघातात नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. १०१ जण सुखरूप बचावले आहेत. या अपघातात नाशिकहून मुंबईला उपचारासाठी आलेलं संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले आहे. दोन दिवस रुग्णालयात उपचार केल्यानंतर हे कुटुंब समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया परिसरात आले होते. या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंबाचा बुडून मृत्यू झाला आहे.
राकेश आहिरे, पत्नी हर्षदा आहिरे आणि मुलगा निधेश आहीरे असे बोट दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबाचे नाव आहे. ते पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी होते. राकेश आहिरे हे दम्याच्या उपचारासाठी दोन दिवसापुर्वी पत्नी व मुलासह मुंबई आले होते. दोन दिवस रूग्णालयात वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर आहिरे कुटुंब बुधवारी सायंकाळी मुबंईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटीला धडक दिली आणि या दुर्घटनेत आहेर कुटुंबीयांचा मृत्यू झाला.
राकेश आहिरे हे दम्याच्या आजारावर उपचारासाठी ते नेहमी मुंबईला जात असत. यावेळी ते पत्नी हर्षदा आहेर (वय 28) आणि मुलगा निधेश (वय 5) यांच्यासह उपचारासाठी मुंबईतील खासगी रूग्णालयात आले. रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या ठिकाणी समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले. पण नौदलाच्या बोटीने प्रवाशी बोटीला दिलेल्या धडकेत संपूर्ण आहेर कुटुंबीयाचा मृत्यू झाला. राकेश आहेर यांचा जागीच पाण्यात बुडून मुत्यू झाला. पत्नी हर्षदा आणि निधेश यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. आहेर कुटुंबातील तिघांचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
धक्कादायक! एलिफंटाला ८० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली…
खांबोली तलावात फर्ग्युसन महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी बुडाले
हृदयद्रावक! जळगावमध्ये तीन मुलांचा धरणात बुडून मृत्यू…
उजनी धरणात बोट उलटल्याने पाच जण बुडाले…
हृदयद्रावक! एकमेकांना मिठी मारल्याने चौघांचा बुडून मृत्यू…
अहमदनगर जिल्हा हादरला! मांजरीमुळे एकाच कुटुंबातील सहा जण बुडाले…

