
नवरदेवाने इन्स्टन्ट लोन कंपनीकडून पैसे घेतले पण एजंट्सनी पत्नीचे फोटो केले मॉर्फ अन्…
विशाखापटनम् (आंध्र प्रदेश): इन्स्टन्ट लोन देणाऱ्या कंपनीकडून एका युवकाने दोन हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. पण कंपनीनं या कर्जावर मोठे व्याज लावले. यामुळे कर्जाची परतफेड करू शकला नाही. त्यामुळे कर्ज वसुलीसाठी लोन देणाऱ्या कंपनीच्या एजंट्सनी युवकाला त्रास द्यायला सुरुवात केली. आरोपींनी युवकाच्या पत्नीचे फोटो मॉर्फ करुन व्हायरल केले. या त्रासाला कंटाळून नरेंद्र वय २५) या युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नरेंद्र हा विशाखापटनम् येथे राहत होता. तो मासेमारी करून आपला उदरनिर्वाह चालवत होता. मात्र, मागच्या काही दिवसांपासून वातावरणीय बदलांमुळे तो मासेमारी करण्यासाठी गेला नव्हता. यामुळे त्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. यामुळे त्याने इन्स्टन्ट लोन देणाऱ्या कंपनीकडून दोन हजार रुपये घेतले होते. यानंतर नरेंद्र याने २ हजार रुपयांच्या कर्जासाठी व्याजाची रक्कम भरली होती. तरीही कंपनीकडून वाढीव व्याज लावून अधिक पैशांची मागणी केली जात होती.
एजंटचा कर्जासाठी तगादा सुरू होता. आरोपींनी कर्जाच्या वसुलीसाठी नरेंद्र याच्या पत्नीचे फोटो मॉर्फ करून त्याच्या मित्र परिवारामध्ये व्हायरल केले आणि ब्लॅकमेल करायला सुरुवात झाली. हा प्रकार सहन न झाल्याने आणि मित्र परिवारात बदनामी झाल्याने नरेंद्र याने ७ डिसेंबरला आत्महत्या केली.
नरेंद्र याचे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. पण अवघ्या २ हजारांच्या कर्जासाठी लोन देणाऱ्या कंपनीने त्याला आत्महत्या करायला भाग पाडले. याप्रकरणी आता नरेंद्र याच्या कुटुंबीयांनी विशाखापट्टनम पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…
एकाला तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा; कसा पाहा…
पुण्यातील IT इंजिनिअरकडून उकळले तब्बल सहा कोटी उकळले…
Cyber Crime! Whatsapp वर लग्नाचं निमंत्रण आलं तर सावधान…
Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख…
पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…
आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…
युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…
सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…
महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…

