
लोणीकंद दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपीस गुन्हे शाखा युनिट ६ने केले गजाआड…
पुणे (संदिप कद्रे): लोणीकंद दुहेरी हत्याकांडातील मोक्यातील तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट ६ने गजाआड केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
गुन्हे शाखा युनिट 6 कडील पोलिस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत 22/10/2024 रोजी आगामी विधानसभा निवडणूक अनुषंगाने पाहिजे व फरार आरोपींचा शोध व गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. पो अंम 2688 ऋषीकेश व्यवहारे, पो अंम 8159 ऋषिकेश ताकवणे, पो अंम 8203 सचिन पवार यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, लोणीकंद पोलिस स्टेशन गु र नं 20/2022 भा दं वि कलम 302, 307, 341, 143, 147, 148, 149, 427, आर्म अँक्ट 3(25), 4(25), क्रि लॉ अमेंटमेंट अँक्ट 3, 7, महा. पोलिस कायदा कलम 135, (1), (3), सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3, 1, (i), 3, 2 प्रमाणे मोक्यातील पाहिजे आरोपी ऋग्वेद उर्फ जालिंदर (वय 23 रा. पेरणे टोलनाक्याजवळ, पेरणे, ता. हवेली, जि. पुणे) हा राहते घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. सदर बातमीच्या अनुशंगाने स्टाफसह जावून खात्री केली असता त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे.
सन 2022 मधे वर नमूद आरोपीने त्याचे इतर साथीदारांचे मदतीने जुने भांडणाचे वादातून प्रथमेश कुमार शिंदे व त्याचे वडील कुमार शिंदे यांचा खून करण्यात आला होता. सदर गुन्ह्याला मोक्का कायद्याचे कलम वाढवण्यात आले होते. सदर आरोपीवर यापूर्वी खून, भांडणे, व बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे नोंद आहेत. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी सहा पोलिस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त गुन्हे, सहा. पोलिस आयुक्त गुन्हे-2 राजेंद्र मुळीक या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहीद पठाण, सहा. पोलिस निरीक्षक मदन कांबळे, पोलिस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, संभाजी सकटे, रमेश मेमाणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, समीर पिलाने, बाळासाहेब तनपूरे, गणेश डोंगरे, प्रतीक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांचे पथकाने केली आहे.
पुणे शहरात आणखी एका कारमध्ये सापडले लाखो रुपये…
गुन्हे शाखा युनिट ६ची अवैध दारू भट्ट्यांवर धडक कारवाई…
पुणे शहरात रेकार्डवरील सराईत गुन्हेगारास पिस्टल व काडतुसह युनिट २ कडून जेरंबद…
पुणे शहरात बाणेर टेकडीवर महिलांना जबरदस्तीने लुटणारी टोळी जेरबंद…
दरोडा व वाहन चोरी विरोधी 01 पथकाकडून वाहन चोरीचे 02 गुन्हे उघड…

