
पुणे! आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; सोशल मीडियावर ओळख; प्रेमविवाह अन्…
पुणे : आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत विनायक तुकाराम भवारी (वय ३१) या आरोपीला आळेफाटा येथून अटक केली आहे. संशयातून त्याने हे क्रूर कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
धनश्री केदारी (वय ६) आणि शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७०) अशी मृतांची नावे आहेत. धनश्रीची आई संगीता केदारी या गुरुवारी रात्री हॉस्पिटलमध्ये कामावर गेल्या होत्या, त्यामुळे धनश्री शेजारील मंगल शिंदे यांच्याकडे होती. रात्री उशिरा संगीता यांचा पती व धनश्रीचा नात्याने आजोबा असलेला आरोपी विनायक भवारी तेथे आला. मंगल शिंदे या पत्नीला आपल्याविरुद्ध भडकवतात, असा संशय आरोपीच्या मनात होता. याच रागातून त्याने प्रथम मंगल शिंदे यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर ओळख पटेल या भीतीने चिमुकल्या धनश्रीचा उशीने तोंड दाबून खून केला.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलिस निरीक्षक कसबे आणि उपनिरीक्षक भरत गोसावी यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला. तो आळेफाटा येथे पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. संगीता केदारी आणि आरोपी विनायक भवारी यांचा दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून परिचय होऊन प्रेमविवाह झाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यात वाद असल्याने तो वेगळा राहत होता. या वादातून दोघींची हत्या केली. या घटनेमुळे आळंदी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
आरोपी आणि फिर्यादी संगीता केदारी यांची दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ओळख होऊन नंतर विवाह झाला होता. मात्र, अलीकडील काळात त्यांच्यातील नात्यात तणाव वाढला होता. घरात येण्यास विरोध, तसेच नातेसंबंध तोडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा संशय आरोपीला होता. याच रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. घटनेच्या रात्री संगीता केदारी कामानिमित्त बाहेर असताना आरोपीने घरात प्रवेश करून झोपेत असलेल्या चिमुरडीचा गळा आवळला, तर वृद्धेवर प्राणघातक हल्ला केला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आळंदी पोलिस आणि क्राईम ब्रँचने तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या आधारे आरोपीचा माग काढत पोलिसांनी त्याला अटक केली आली आहे.
पुणे जिल्ह्यातील पत्नीची एसयूव्हीखाली चिरडून कर्नाटकात केली निर्घृणपणे हत्या…
पुणे जिल्ह्यातून बेपत्ता असलेल्या युवतीचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर…
पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…
पुणे जिल्ह्यात लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या पत्नीची हत्या…
पुणे जिल्ह्यातील प्राध्यापकाच्या चपला विहिरीच्या काठावर दिसल्या अन्…

