पोर्न स्टार रिया बर्डे हिला पोलिसांनी केली अटक; धक्कादायक कारण…

मुंबईः पॉर्न स्टार रिया बर्डे हिच्यावर बनावट कागदपत्रांद्वारे भारतात राहिल्याचा आरोप असून, या आरोपामुळे तिला उल्हासनगर येथील हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. भारतीय पोर्न इंडस्ट्रीत रियाला आरोही बर्डे आणि बन्ना शेख या नावानेही ओळखले जाते.

या प्रकरणी आयपीसी 420, 465, 468, 479, 34 आणि 14अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिया मूळची बांगलादेशी असून तिची आई, भाऊ आणि बहीण बनावट कागदपत्रे बनवून भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचा आरोप आहे. विशेष बाब म्हणजे बांगलादेशी असूनही रियाच्या आईने भारतीय कागदपत्रे मिळवण्यासाठी अमरावती येथील एका व्यक्तीशी लग्न केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी या प्रकरणात रियाशिवाय तिची आई अंजली बर्डे उर्फ ​​रुबी शेख, वडील अरविंद बर्डे, भाऊ रवींद्र उर्फ ​​रियाज शेख आणि बहीण रितू उर्फ ​​मोनी शेख यांनाही आरोपी केले आहे. हिललाइन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली रिया अनेक प्रोडक्शन हाऊसशी संबंधित असून तिने अनेक पॉर्न फिल्म्समध्ये काम केले होते. याशिवाय रियाला पॉर्न इंडस्ट्रीत आरोही या नावानेही ओळखले जाते. तपासात रियाची आई अंजली ही बांगलादेशची रहिवासी असून ती आपल्या दोन मुली रिया आणि मुलासह भारतात अवैधरित्या राहत होती. रियाच्या आईने अमरावती येथील रहिवासी असलेल्या अरविंद बर्डे यांच्याशी विवाह केला, त्यांनी पश्चिम बंगालचे रहिवाशी असल्याचा दावा केला आणि नंतर स्वत: आणि तिच्या मुलांसाठी बनावट जन्म प्रमाणपत्र आणि इतर बनावट कागदपत्रे बनवून भारतीय नागरिकाचा पासपोर्ट मिळवला.

रियाची आई आणि वडील दोघेही सध्या कतारमध्ये राहत असल्याचे पोलिसांना आढळून आले असून, पोलिस तिच्या भावाचा आणि बहिणीचाही शोध घेत आहेत. रियाला यापूर्वी मुंबई पोलिसांनी वेश्याव्यवसायाशी संबंधित एका प्रकरणात अनैतिक वाहतूक कायद्यांतर्गत अटक केली होती. रियाचा मित्र प्रशांत मिश्रा याला ती मूळची बांगलादेशची असून बेकायदेशीररीत्या देशात राहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी त्यांची कागदपत्रे तपासली आणि त्यानंतरच संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबईत पॉर्न फिल्मचे शूटिंग सुरु असताना पोलिसांनी टाकली धाड…

पाचगणीमध्ये रिसॉर्टवर पोलिसांचा छापा; बारबालांसह 48 जण ताब्यात…

बदनामीचा मेल! XXXची बायको पॅार्न एक्ट्रेस सारखी दिसते…

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने घेतला घटस्फोटाचा निर्णय…

राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ईडीचा दणका; कोट्यावधींची संपत्ती जप्त…

पुणे शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह दोन मॉडेल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!