पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन; शेवटच्या नोटमध्ये लिहिलं…

पुणे : पुणे शहरात एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या युवकाने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रथमेश दिलीप देशमुख (वय २५, मुळ रा. परंडा, जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

प्रथमेश देशमुख याच्यावर अडीच लाख रुपयांचे कर्ज होते, त्याच आर्थिक अडचणीतून प्रथमेशने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, प्रथमेशने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून पेपरफुटीवरुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनीही सरकारवर हल्लाबोल करत एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

प्रथमेशने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती, जी पोलिसांना सापडली. या चिठ्ठीत आर्थिक अडचणी आणि त्याने ज्या व्यक्तींकडून पैसे घेतले होते, त्यांच्या व्यवहारांचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. प्रथमेशने पुणे सोडून गावी जाण्याचा विचारही केला होता. त्याच्या खोलीचे भाडेदेखील थकले होते. या प्रकरणात नारायण पेठ पोलीस चौकीत गुन्हा नोंद करण्यात आला असून विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दरम्यान, पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मोर्चात काँग्रेस पक्ष सक्रीय होता. MPSC अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावा किंबहुना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच भ्रष्टाचार आणि पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा घ्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. एमपीएससी अध्यक्षांनी राजीनामा न दिल्यास MPSC अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत आणि त्यांनीच पेपरफुटीसाठी त्यांना नेमले होते असा अर्थ निघेल, असेही सपकाळ यांनी म्हटले. महाराष्ट्र सरकार आंधळं बहिरं आहे, धाराशिवमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली, हा सरकारने घेतलेला बळी आहे. त्यामुळे, प्रथमेश यांच्या आत्महत्येस सरकार जबाबदार आहे. प्रथमेशच्या आत्महत्येनंतर तरी आता अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही प्रथमेशच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन करत, कुणीही टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारसाठी तुमचा जीव महत्त्वाचा नसेल, पण तुमच्या कुटुंबीयांसाठी अधिक मोलाचा आहे, असे अभिजीत दीपके म्हटले आहे.

पुणे शहरात MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला जगाचा निरोप…

MPSC स्पर्धा परीक्षेत 3 गुण कमी पडल्यामुळे युवकाची आत्महत्या…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

Video! पोलिस अधिकारी IPS अमिताभ गुप्ता यांची विशेष मुलाखत…

जिद्दीच्या जोरावर बनला IPS; गावकऱ्यांनी काढली चक्क हत्तीवरून मिरवणूक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!