डॉक्टरांची भावनिक पोस्ट प्रचंड व्हायरल अन् चिमुकलीचे आई-वडील आले समोर; धक्कादायक कारण…

पुणे : पुणे जिल्ह्यातील देहू जवळ असलेल्या भंडारा डोंगरावर रविवारी (ता. 6) एक दीड वर्षाची चिमुकली एकटीच सापडली होती. चिमुकलीला YCM हॉस्पिटल पिंपरी चिंचवड येथे बालरोग विभागात दाखल करण्यात आले होते. चिमुकलीची अवस्था पाहून पोलिस आणि डॉक्टरही भावुक झाले होते. पोलिसांना तपासात मदत करण्यासाठी डॉ. प्रकाश कोयाडे यांनी चिमुकलीबद्दल एक भावनिक पोस्ट लिहिली आणि ती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. अखेर, चिमुकलीचे आई वडील स्वतःच पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले आहेत.

चिमुकलीच्या आई-वडिलांनी तिला अशाप्रकारे एकटं डोंगरावर सोडण्यामागचे धक्कादायक कारण पोलिसांना सांगितले. “कोणीतरी दानशूर किंवा चांगलं कुटुंब तिला घेऊन जाईल आणि तिचा चांगला सांभाळ करेल,” या आशेने आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकलीला देहूजवळील ओसाड भंडारा डोंगरावर एकटे सोडून दिल्याचे जन्मदात्या आई-वडिलांनी सांगितले. गरिबी आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून आई-वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पती कामगार आणि पत्नी गृहिणी असलेले हे दांपत्य अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे. आपल्या चिमुकलीला दारिद्र्याचे चटके सोसावे लागू नयेत, म्हणून त्यांनी रविवारी तिला भंडारा डोंगरावर एकटेच सोडले, असे सांगितले. सुदैवाने इथे एक चिमुकली एकटी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मुलीची सुटका करून तिला पिंपरीतील वायसीएम (YCM) रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉ. प्रकाश कोयाडे यांनी या घटनेबाबत लिहिलेली भावनिक सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती.

मुलीला सोडून दिल्यानंतर सोमवारी सायंकाळी पश्चात्तापाने आई-वडील स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले. सुरुवातीला त्यांनी मुलगी मुंबईत सापडल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून देत आपल्या कृत्याची कबुली दिली. सध्या ती चिमुकली रुग्णालयात सुरक्षित असून, वैद्यकीय व डीएनए (DNA) तपासणीनंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे तिची बालगृहात रवानगी केली जाणार आहे.

दरम्यान, या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अजय शिवशंकर यादव (वय २३) आणि खुशबू अजय यादव (वय २२, दोघे रा. वासुली, मूळ उत्तर प्रदेश) या दांपत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक विवंचनेमुळे मुलीचा सांभाळ करणे शक्य नसल्याने तिला डोंगरावर सोडल्याची कबुली आई-वडिलांनी दिली आहे. तरीही पोलिस सर्व बाजूने या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, अशी माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी दिली.

पुणे पोलिसांनी 70 कॅमेरे तपासले अन् चिमुकलीची केली सुटका; पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव…

शिक्षिकेची हृदयद्रावक सुसाईड नोट; तीन महिन्यांच्या चिमुकलीने मुखाग्नी द्यावा अन्…

पुणे! चिमुकली पाळण्यात निपचित पडलेली तर पत्नीच्या गळ्याला दोर…

कुटुंबातील पाच जणांचा करंट लागून मृ्त्यू; चिमुकली मृतदेहांजवळ बसून राहिली रडत…

पुणे Video: चिमुकली खिडकीतून पडण्याच्या स्थितीत असतानाच जवानाने घेतली धाव…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!