
हाथरस चेंगराचेंगरी! सत्संगवाला भोले बाबाच्या वहिनीने केला खुलासा…
हाथरस (उत्तर प्रदेश): हाथरसमध्ये सूरजपाल उर्फ भोले बाबाच्या सत्संगात मंगळवारी (ता. २) झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ११७ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर भोले बाबा फरार झाला असून, त्याच्या कुटुंबातीलच वहिनीने मोठा खुलासा केला आहे.
सूरजपाल उर्फ भोले बाबाच्या लहान भावाच्या पत्नी म्हणजेच वहिनीने सांगितले की, ‘भोले बाबाने एकदा माझ्या मुलांना मारहाण केली होती. तेव्हा हे प्रकरण पोलिसातही गेले होते. भोले बाबाच्या सत्संगात आम्ही कधीच गेलो नाही. तसेच आमचा त्याचाशी काही संबंध नाही. सख्ख्या भावाच्या मृत्यूनंतरही तो परत आला नाही. कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याच्या निधनानंतर जर आला नाही तर त्याच्याशी आम्हाला काही देणं-घेणं नाही. भोले बाबाच्या कुटुंबाशी आता आमचा काही संबंध नाही.’
‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
सूरजपाल उर्फ भोले बाबाने पोलिस खात्यामध्ये नोकरी केली आहे. नोकरी सोडल्यानतर भोले बाबा बनून सत्संग आणि पूजा अर्चा करायला सुरुवात केली. सस्तंगामध्ये त्याची पत्नी सुद्धा त्याला मदत करत होती, असेही वहिनीने सांगितले आहे. दरम्यान, सूरजपाल उर्फ साकार हरी बाबा उर्फ भोले बाबा नावाने ओळखला जातो. आग्र्यातूनच सूरजपालच्या विश्व साकार हरी उर्फ भोले बाबा होण्याची सुरुवात झाली होती. केदार नगरमध्ये सूरजपाल त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. हळू हळू त्याने पांढरे कपडे घालून ओळख बनवली आणि आजूबाजूच्या महिलांसाठी बाबा बनला. त्याने आग्र्यातील केदारनगरमध्ये एक लहान झोपडी उभारली आणि तिथेच भोले बाबा बनून सत्संग आणि पूजा अर्चा करायला सुरुवात केली.
दरम्यान, हाथरस दुर्घटनेतील १०९ मृतदेहांची ओळख पटली आहे. एटा, आग्रा, संभल, ललितपूर, अलीगढ, बदायू, कासगंज, मथुरा, औरैया, पीलीभीत, शाहजहाँपूर, बुलंदशहर, हरियाणातील फरीदाबाद, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, राजस्थानमधील डीग या जिल्ह्यातूनही भाविक आले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.
उत्तर प्रदेशात सत्संगात चेंगराचेंगरीत १०७ जणांचा मृत्यू…
पोलिसकाकाची घराजवळच गोळ्या झाडून निर्घृण हत्या…
Video: राष्ट्रीय खेळाडूने धबधब्यात मारली उडी अन् गमावला जीव…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

