उत्तर प्रदेशात सत्संगात चेंगराचेंगरीत १०७ जणांचा मृत्यू…

लखनौ (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन १०७ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम सुरु होता यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील रतिभानपूर येथे ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. या सत्संगाचा समारोप कार्यक्रम सुरु होता. यावेळी ही दुर्घटना घडली आहे. प्रवचन संपल्यानंतर भाविक निघाले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. शिवाय, प्रवचन सुरू असताना शेकडो भाविकांना भीषण उष्णतेमुळे बेशुद्ध पडले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी पोहोचले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महिला आणि चिमुरड्यांच्या अंगावर पाय ठेवून पुढे जात होती. त्यांना वाचवण्यासाठी तिथे कुणीच आले नाही. चेंगराचेंगरीत सापडलेल्या महिला आणि मुलांनी मदतीसाठी एकच आक्रोश केला होता. पण, कुणी मदतीला पुढे आलं नाही, असे या प्रत्यक्षदर्शी चिमुरडीने सांगितले. मृत आणि जखमींना अक्षरश: टेम्पोमधून रुग्णालयात आणण्यात आले आहे. रुग्णालयामध्ये मुख्य आरोग्य अधिकारी उमेश त्रिपाठी, जिल्हाधिकारी विक्रांत द्विवेदी आणि पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय अधिकारी हजर आहे.

भोले बाबांच्या सत्संगाचा समारोप सोहळा सुरू असतानाच चेंगराचेंगरी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी एटा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले आहे. सिकंदरराव पोलीस स्टेशन हद्दीतील फुलराई गावात भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली, त्यात १०७ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एटा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश कुमार त्रिपाठी यांनी दिली. दरम्यान, मृतांमध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. अनेक जण जखमी झाले असून त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. शवविच्छेदन तपासणी आणि पुढील कार्यवाहीसाठी मृतांचे मृतदेह एटा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहेत. मृत भाविकांची ओळख पटवली जात आहे.

‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

मंत्र्याच्या पत्नी पोलिस अधिकाऱ्याला नको नको ते बोलली…

Video: राष्ट्रीय खेळाडूने धबधब्यात मारली उडी अन् गमावला जीव…

नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!