हृदयद्रावक! पतीला फोन करून मुलीचं शेवटचं तोंड पाहा म्हणाली अन्…

लातूर : मुलांना इंग्रजी शाळेत शिकवता येत नसल्याने पत्नीने मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भाग्यश्री व्यंकट हालसे असे आईचं नाव असून तिने मुलगी समीक्षा हिच्यासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आई आणि मुलीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

लातूर जिल्ह्यातील माळेगाव येथे व्यंकट हालसे हे त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलीसोबत राहतात. दीड एकर शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्याने दोन्ही मुलांना इंग्रजी शाळेत घालणे शक्य नव्हते. पण, व्यंकट यांची पत्नी भाग्यश्री यांना मुलांनी इंग्रजी शाळेत शिकावे असे वाटत होते. त्यासाठी पतीकडे मुलांना सीबीएसई शाळेत पाठवण्याची विनंती करत होत्या. पती व्यंकट यांनी पत्नी भाग्यश्रीची अनेकदा समजूत काढली. पण मुलांना इंग्रजी शाळेत शिकवता येत नसल्याने पत्नी नैराश्यात गेली होती. शेवटी मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास मुलीसह भाग्यश्री यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिथून पतीला फोन करून मुलीचे शेवटचं तोंड पाहा म्हणाली आणि विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

भाग्यश्री हालसे या मुलीसोबत आत्महत्या करण्यासाठी जात असताना मुलगा बाहेरच खेळत होता. त्यालाही घेऊन त्या निघाल्या होत्या. मात्र, खेळण्यासाठी मुलगा सार्थकने हात सोडवून घेत तिथून पळ काढला. मुलगा खेळायला गेल्याने त्याचा जीव वाचला आहे. दरम्यान, भाग्यश्री या गेल्या वर्षभरापासून नैराश्यात होत्या. गेल्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले. तेव्हापासून सतत आईच्या आठवणीत रडत असायच्या. त्यातून नैराश्य आले होते, असे भाग्यश्री यांच्या भावाने पोलिसांना सांगितले.

हृदयद्रावक! एक तासापूर्वी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून मृत्यू…

हृदयद्रावक! लग्नानंतर चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू…

हृदयद्रावक! डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून 8 पानी पत्र लिहून घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! एकमेकांना मिठी मारल्याने चौघांचा बुडून मृत्यू…

हृदयद्रावक Video! वलिडांना अमानुषपणे केली मारहाण, सोडला जीव…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!