
कोपर्डी घटनेतील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या; तमाशात नाचल्याने…
अहमदनगर : कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मागासवर्गीय तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून, नग्न करत मारहाण करण्यात आल्यामुळे व्यथित झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला. या प्रकरणी तिघांविरोधात गु्हा दाखल झाला आहे.
विठ्ठल कांतीलाल शिंदे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या वडिलांनी कर्जत पोलिसात तक्रार दाखल केली आहे विठ्ठलचं १ मे रोजी कोपर्डीत भैरवनाथ यात्रेवेळी तमाशात भांडण झाले होते. दिनेश बाबासाहेब सुद्रिक, स्वप्निल सुद्रिक, वैभव सुद्रिक यांनी त्यावेळी त्याला मारहाण केली होती. मुलाची चौकशी करायला घरी गेल्यावर तो घरीच आला नसल्याचं समजले. थोड्या वेळाने विठ्ठल स्मशानभूमीत नग्नावस्थेत असल्याचे समजले आणि तिथून त्याला घरी आणले.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
तमाशात नाचल्याने विठ्ठलला शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. त्याला कपडे काढून नग्नावस्थेत मारहाण झाली. आपल्याला अपमानित केल्याने जगण्याची इच्छा नसल्याचे विठ्ठल म्हणाल्याचं त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. बुधवारी विठ्ठलसोबत घडलेल्या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी बाबुराव गोपाळ शिंदे यांच्या घरी त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्याच्या खिशात एक चिठ्ठीही आढळली असून त्यात माझे जीवन संपवत आहे आणि याला बंटी सुद्रिक, स्वप्निल सुद्रिक कारणीभूत आहेत, असं लिहिले आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, कोपर्डीत १३ जुलै २०१६ रोजी एका शालेय मुलीवर अत्याचार झाला होता. या घटनेनंतर मराठा समाजाने मूक मोर्चे राज्यभरात काढले होते. या प्रकरणात जितेंद्र बाबूलाल शिंदे हा मुख्य आरोपी होता. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, तुरुंगातच त्याने आत्महत्या केली. तर विठ्ठल शिंदे हा आरोपी जितेंद्रचा चुलत भाऊ आहे. त्याने जितेंद्रच्या घरीच गळफास घेऊन जीवन संपवले आहे.
पोलिसकाकाला चोरांनी टोचलं इंजेक्शन अन् झाला मृत्यू…
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…
हृदयद्रावक Video! वलिडांना अमानुषपणे केली मारहाण, सोडला जीव…
अहमदनगर जिल्हा हादरला! मांजरीमुळे एकाच कुटुंबातील सहा जण बुडाले…
अहमदनगर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरवर गुन्हे दाखल करा…
दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

