पुणे शहरात मायलेकाची तब्बल ८ कोटी ८१ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक…

पुणे: बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा आणि त्याबदल्यात फ्लॅट देण्याचे मोठे आमिष दाखवून एका मायलेकाची तब्बल ८ कोटी ८१ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश घिसुलाल मेहता (संचालक, ड्रीम्स कॉर्पोरेशन), उमेश शशिकांत अंबेकर (रा. बिबवेवाडी), हसमुख प्रकाश बोटीया (रा. मालाड ईस्ट, मुंबई) आणि हितेश सुभाष लोंढा (रा. महर्षीनगर, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फसवणुकीचा प्रकार सप्टेंबर २००९ ते मार्च २०१७ या प्रदीर्घ कालावधीत घडला. आरोपींनी संगनमत करून तक्रारदार आणि त्यांच्या आईला गाठले. “आमच्या बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक करा, तुम्हाला खूप चांगला आर्थिक परतावा मिळेल,” असे आमिष त्यांनी मायलेकांना दाखवले. या भूलथापांना बळी पडून पीडित मायलेकांनी एकूण ८ कोटी ८१ लाख ९२ हजार रुपयांची मोठी रक्कम वेळोवेळी आरोपींकडे सोपवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

धक्कादायक बाब म्हणजे, गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने ही सर्व रक्कम मुख्य आरोपी रमेश मेहता यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करून घेण्यात आली होती. विश्वास बसावा म्हणून आरोपींनी गुंतवणुकीच्या बदल्यात सममूल्य किमतीचे फ्लॅट देण्याचे एक ‘नोटराइज’ सामंजस्य करारपत्रही लिहून दिले होते. मात्र, आरोपींनी ठरल्याप्रमाणे ना परतावा दिला, ना फ्लॅटचा ताबा दिला आणि मुख्य म्हणजे गुंतवलेली मूळ रक्कमही परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, पीडित मायलेकांनी थेट पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या प्राथमिक तपासानंतर चतुःशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! भोंदूबाबा अश्लिल व्हिडिओ पाहायचा अन् महिला अनुयायींसमोरच…

पुणे! नसरापुरातील आरोपी म्हणाला; मुलीला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला अन्…

पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

पुणे शहरातील विविध भागांमध्ये झालेल्या फसवणूकीच्या तक्रारींचा आढावा…

पुणे पोलिसांचा १७ तासांचा थरार; आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!