
कोल्हापूर हादरलं! युवकावर गोळ्या झाडल्यानंतर धारदार शस्त्राने वार…
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये शहरातील जवाहर नगरात सरनाईक वसाहतीत रविवारी (ता. २१) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सहा ते सात जणांनी शाद शौकत मुजावर याच्यावर गोळीबार केला आणि धारदार शस्त्राने वार केले. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहे.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
शाद मुजावर त्याच्या मित्रांसोबत रविराी रात्री घराजवळ असलेल्या कट्ट्यावर बसला होता. त्यावेळी चारचाकी आणि दुचाकीवरून आलेल्या सहा ते सात जण आले. त्यांनी शादच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी शादच्या मांडीत घुसली. तर दोन गोळ्यांचा नेम चुकल्याने शाद वाचला. शाद शौकतवर सहा ते सात जणांनी गोळीबारासह कोयत्यासारख्या धारदार शस्त्रानेही हल्ला केला. त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला पण त्यामधून तो वाचला. मात्र गोळी लागून तो जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत तत्काळ सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, शाद हा चारचाकी गाड्या आणि जमीन खरेदी विक्री करण्याचे काम करतो. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी चौथ्यांदा गोळीबार…
पुणे जिल्ह्यात हॉटेलमध्ये बसलेल्या व्यक्तीवर तिघांकडून गोळीबार…
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; ॲाफिसमध्ये नेमकं काय काय घडलं?
कोल्हापूरमध्ये रोहित शर्मा आऊट झाल्यामुळे वृद्धाचे फोडलं डोक…
कौतुकास्पद! कोल्हापूर परिक्षेत्रात सोलापूर ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी…
क्रांतीकुमार पाटील: कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

