
पुणे जिल्ह्यात हॉटेलमध्ये बसलेल्या व्यक्तीवर तिघांकडून गोळीबार…
पुणे : पुणे जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये बसलेल्या व्यक्तीवर तिघांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत संबंधीत व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
इंदापूरच्या एका हॉटेलमध्ये युवकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेत अविनाश धनवे या युवकाचा मृत्यू झाला. चाकणमध्ये हॉटेलमध्ये बसलेल्या एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आल्याची घटना तशीच घडली आहे.
चाकण शहरापासून काही अंतरावर असलेल्या रासे फाटा परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. तीन आरोपींनी जिवे मारण्याच्या उद्देशाने हॉटेलमध्ये बसलेल्या स्वप्नील संजय शिंदे उर्फ सोप्या शिंदेवर गोळीबार केला आणि धारदार शस्त्राने वार देखील केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत सोप्या शिंदे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राहुल पवार, अजय गायकवाड व एका अज्ञात आरोपीने हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आरोपी आणि जखमी दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. राहुल पवार याचा लहान भाऊ रितेश पवार (राहणार म्हाळुंगे खेड) याची चार महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. त्या खूनातील आरोपीला सोप्या शिंदे याने मदत केल्याची माहिती राहुल पवार याला मिळाली होती. यातूनच हा हल्ला झाल्याची माहिती पुढे आली आहे. हल्ला केलेल्या आरोपींपैकी अजय गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आले, इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
इंदापूर हादरले! हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलेल्या युवकाची हत्या…
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; ॲाफिसमध्ये नेमकं काय काय घडलं?
गोळीबाराच्या घटनेतील माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…
पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…
भाजप आमदार गणपत गायकवाड यांना पोलिस कोठडी…

