
मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल…
बीडः मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना परवाना रॅली काढून जेसीबीने फुल उधळल्या प्रकरणी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील आणि इतर 12 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दहा दिवसांत जरांगे यांच्यावर हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर आतापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
मनोज जरांगे यांनी मंगळवारी बीड जिल्ह्याचा दौरा केला. परवानगी नसतांना देखील रॅली काढून जीसीबीने धोकादायक पद्धतीने फुल उधळल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर बीड शहरातील पेठ बीड पोलिस ठाणे आणि पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर आणि पेठ बीडमध्ये मनोज जरांगे यांच्यासह इतर 12 जणांवर देखील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील हे काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना जेसीबीच्या माध्यमातून फुल उधळून स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी मोठी गर्दी देखील जमवण्यात आली होती. धोकादायक पद्धतीने जेसीबीचा वापर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.
मनोज जरांगे यांच्यावर यांच्यावर पाच गुन्हे दाखल झाले आहेत. ज्यात चार गुन्हे बीड जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहेत. पहिला गुन्हा शिरूर पोलिस ठाणे, दुसरा अमळनेर, तिसरा गुन्हा पेठ बीड पोलिस ठाणे आणि चौथा गुन्हा पिंपळनेर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तर, नांदेड जिल्ह्यात देखील एक गुन्हा जरांगे यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.
मनोज जरांगे यांचे सहकारी पोलिसांच्या ताब्यात; संचारबंदी, बस पेटवली, इंटरनेट बंद…
मनोज जरांगे मुंबईकडे, पोलिसांनी बदलला मार्ग…
मनोज जरांगे यांची पुण्यात सभा; वाहतूकीत बदल…
मराठा आंदोलनानंतर गृहविभागाचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

