
ड्राय आईस! हॉटेलमध्ये माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांना रक्ताच्या उलट्या…
गुडगाव (हरियाणा): गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांना रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत. या माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांची प्रकृती बिघडली असून दोन जण अत्यवस्थ आहेत. रेस्टॉरंटमध्ये नागरिकांना माऊथ फ्रेशनरच्या जागी ड्राय आईस दिला आणि तो खाऊन ग्राहकांच्या तोंडातून रक्त येऊ लागले आहे.
संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोकांच्या तोंडातून रक्त येत असल्याचं दिसत आहे. माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर या लोकांची तब्येत बिघडी आहे. अंकित कुमार नावाच्या व्यक्तीने रेस्टॉरंटविरोधात आरोप केले असून या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे.
हरियाणाच्या गुडगावमधील एका रेस्टॉरंटमध्ये माऊथ फ्रेशनर म्हणून सर्व्ह केलेल्या ड्राय आईस म्हणजे कोरड्या बर्फामुळे ग्राहकांच्या तोंडातून रक्त आलं. वाढदिवस साजरा करण्यासाठी वेट्रेसने ग्राहकांना चुकून ड्राय आईस दिल्याचे सांगितले जात आहे. कोरड्या बर्फाचे दाणे दिले, ज्यामुळे त्यांची जीभ आणि टाळू खराब झाले, असे पोलिस आणि रेस्टॉरंटने सांगितले. ड्राय आईसमुळे ग्राहकांच्या तोडांतू रक्त येऊ लागलं. याप्रकरणी विषबाधा करून नुकसान केल्याच्या आरोपाखाली वेट्रेसवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
ड्राय आईस म्हणजे काय…
ड्राय आईस म्हणजे कोरड्या बर्फाचा वापर हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये केला जातो. ड्राय आईस कार्बन डाय ऑक्साईडचे घनरूप आहे, जे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे, कारण ड्राय आईस वायू स्वरूपात रूपांतरित होतो.
अभिनेत्री जया प्रदा पोलिसांसमोर अचानक राहिल्या हजर…
स्पॅनिश महिलेने सांगितली सामूहिक बलात्काराची थरारक घटना…
‘Jennifer And The Beast’ पुस्तक Online खरेदी करा…
पुणे शहरातील पब, बार, हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार; पाहा नियमावली…
नवरा प्रेयसीसोबत तर पत्नी प्रियकरासोबत गेली पळून; तीन चिमुकल्या रडत आहेत…

