पुणे शहरात खुनाचा गुन्हा आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्याला हडपसर पोलिसांकडून अटक…

पुणे (संदिप कद्रे): एकाच दिवशी हडपसर पोलिस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न व चंदननगर पोलिस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा करणाऱ्या आरोपीस १२ तासाचे आत हडपसर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

०१.०३.२०२४ रोजी रात्री २०.०० वाजताचे सुमारास जखमी राहुल काळे (वय ३९ वर्ष रा. मगरपट्टा हडपसर) यांना आरोपी शुभम निचळ याने जुन्या वादाच्या कारणावरून धारधार शस्त्राने गळ्यावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने त्याबाबत हडपसर पोलिस ठाणे गु.र.नं ३८७ / २०२४ भा.द.वि. कलम ३०७,३२६ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्ह्यचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बर्गे हे करीत आहेत. दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपीचा शोध घेण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षकसंतोष पांढरे यांनी दिलेल्या सुचनांवरून हडपसर पोलिस स्टेशन तपासंपथक अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलिस अंमलदार अतुल पंधरकर, अमोल दणके असे मिळुन आरोपींचा शोध घेत असताना, मिळालेल्या बातमीचे आधारे आरोपी शुभम काकासाहेब निचळ (वय २७ वर्ष, रा. समर्थ बैठक हॉल समोर, होळकरवाडी, पुणे) यास हांडेवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास करीत असताना त्याने सुरवातील उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचेकडे कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता, त्याने हडपसर पोलिस ठाणे येथील वरिल नमुद गुन्ह्यासह ०१.०३.२०२४ रोजी दुपारच्या सुमारास रिव्हरडेल सोसायटी जवळ, खराडी येथे त्याच्या ओळखीच्या बाळू कांबळे यास धारदार शस्त्राने मारून खुन केलेला असल्याचे सांगीतले. आरोपीने सांगीतलेल्या माहीतीवरून चंदननगर पोलिस स्टेशन येथून माहीती घेतली असता सदरबाबत चंदननगर पोलिस स्टेशन येथे गु.र.नं १०६ / २०२४ भा.दं.वि.कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद असल्याचे व त्यातील संशयीताच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये नमुद आरोपी दिसत असल्याचे समजले. आरोपीकडे केले एकंदरीत तपासादरम्यान १) हडपसर पोलिस ठाणे गु.र.नं ३८७ / २०२४ भा.द.वि. कलम ३०७, ३२६ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ २) चंदननगर पोलिस स्टेशन येथे गु.र.नं १०६/२०२४ भा.दं.वि. कलम ३०२ असे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मनोज पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग व आर राजा, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली अश्विनी राख, सहाय्यक पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संतोष पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन, पुणे शहर, श्री. पंडीत रेजितवाड सो, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलिस उप निरीक्षक महेश कवळे, पोलिस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, सचिन गोरखे, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

पुणे शहरात जड वाहनांना नो एन्ट्री! पाहा बदल…

पुणे शहरात वाहन तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही: अमितेश कुमार

पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन!

हडपसर पोलिसांनी हस्तगत केले लाखो रुपयांचे मोबाईल…

हडपसर पोलिसांनी रात्रीच्या वेळी लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना केली अटक…

Video: हडपसर पोलिसांनी गुन्हेगारांची काढली धिंड; पाहा नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!