
यवतमाळ येथील खुनाच्या खटल्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता…
यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ येथील टाटा शोरूम समोर 5 मे 2016 रोजी पैशाच्या वादावरून आशिष शेडमाके यांचा खून झाल्याची घटना घडली होती. त्यात अवधूतवाडी पोलिसांनी तपास करून मृताचा मित्र योगेश गायकवाड यांच्या तक्रारीवरून अवधुतवाडी पोलिसांनी आरोपी प्रविण जाधव विरुद्ध भादंवि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
सदर प्रकरणात प्रथमदर्शी अहवालानुसार अवधुतवाडी पोलिसांनी तपास करून आरोपी विरुद्ध यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर केस मध्ये सरकारी पक्षाच्या वतीने फिर्यादी सोबत 8 साक्षीदार व एक साक्षीदार आरोपीच्या वतीने असे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. विशेष म्हणजे यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली नाही, हे येथे उल्लेखनीय. आरोपी प्रविण जाधव यांचेतर्फे ॲड. एस. एम. अली (यवतमाळ) यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. यावरून जिल्हा न्यायाधीश – 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. लऊळकर यांनी सरकारी व आरोपी पक्ष या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी प्रवीण जाधव याची संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली.
आरोपी प्रविण जाधव तर्फे ॲड. एस. एम. अली (यवतमाळ) यांनी युक्तिवाद केला. तर त्यांना ॲड. राहुल पाटील, ॲड. मनीष भगत, ॲड. एस. टी. अली यांचे सहकार्य लाभले.
यवतमाळ जिल्ह्यातील PI, API पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नेमणूका…
यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…
यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल…
यवतमाळ जिल्ह्यात दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू…
जिल्हा उपनिबंधकासह पाच आरोपीं विरुद्ध अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

