अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; मॉरिस याने यूट्युबवरुन घेतले प्रशिक्षण…

मुंबईः मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येपूर्वी बंदूक कशी हाताळायची यासाठी यूट्युबवरुन प्रशिक्षण घेतल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यामुळे यूट्युबवरील व्हिडीओ पाहून मॉरिस नोरोन्हा याने गोळीबार केल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सुरु आहे.

मॉरिस नोरोन्हा याने साडी वाटपाच्या कार्यक्रमाला अभिषेक घोसाळकर यांना बोलवले होतं. त्यानंतर फेबसबुक लाईव्ह दरम्यान घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर स्वत:वरही त्याने गोळी झाडून आत्महत्या केली. यासाठी मॉरिस नोरोन्हा याने बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याच्या बंदुकीचा वापर केला होता. पोलिसांनी अमरेंद्र मिश्रा याला बेड्या ठोकल्या आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अमरेंद्र मिश्राच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, ‘मिश्राला कामाची गरज होती. दोन महिन्यापूर्वी मॉरिस नोरोन्हा यांनी त्यांना कामाची ऑफर दिली. पण कामावर ठेवण्यापूर्वी शस्त्र ऑफिसमध्ये ठेवून जाण्याची अट घातली होती. त्यानुसार, डिसेंबर 2023 मध्ये ते मॉरिस नोरोन्हा यांच्या कार्यालयात रजू झाले. त्यांना प्रति महिना 40 हजारांचा पगार दिला जात होता.’ दरम्यान, यावरुन मॉरिस नोरोन्हा याने डिसेंबरमध्येच अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा कट रचल्याचे समोर येत आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी अमरेंद्र मिश्रा हा 13 फेब्रुवारीपर्यंत कोठडीत होता. त्याला न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयानी कोठडी सुनावण्यात आली आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; ॲाफिसमध्ये नेमकं काय काय घडलं?

आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी…

गोळीबाराच्या घटनेतील माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…

वाघोलीत पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण अन् हवेत गोळीबार…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!