
पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या धडाकेबाज कारवाया…
पुणे (संदिप कद्रे): पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखेचा पथकाचा कार्यभार स्विकारताच धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखेचा पथकाचा कार्यभार स्विकारताच पथकातील अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना दिल्या. शिवाय. त्या स्वतः व स्टाफ असे पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाणेच्या परीसरात २०/०१/२०२४ रोजी पेट्रोलींग करीत असताना सायंकाळी २१/३० वा वास्तुश्री बिल्डींग समोर, हाईडपार्क पितळे नगर रोड मार्केटयार्ड पुणे येथील सार्वजनिक ठिकाणी परदेशी नागरीक जोसेफ रोतीमी (JOSEF ROTIMI, वय-३० वर्षे, रा. रिदीम चर्च, मिरा रोड, मुंबई मुळ पत्ता नायजेरीया) देशाचा नागरीक याच्या ताब्यात ६,२८,८००/-रू कि ची ३१ ग्रॅम ४४ मिलीग्रॅम कोकोन हा अंमली पदार्थ जप्त करून त्याचे विरुध्द मार्केटयार्ड पोस्टे गु.र.नं.०९/२०२४, एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ ( क ), २१(ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
२३/०१/२०२४ रोजी ०४/२५ वाजता लेन नं ३०, भाग्योदय नगर, कोंढवा पुणे समोरील सार्वजनिक ठिकाणी १) जावेद अजीज सय्यद (वय ३७ वर्षे, रा. गल्ली नं ३३, सनराईस बेकरी जवळ, मिठा नगर कोंढवा व रूम नं ४, चाळ नंबर ३७, अंधेरी सबवे मुंबई), २) मोहम्मद रफिक हशिम शेख (वय ४७ वर्षे, रा ००२, बि विंग, किन्जा अपार्टमेन्ट, कनकिया मिरा रोड, ठाणे मुंबई) यांच्या ताब्यात २,००,०००/- रु.कि.चा १० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करून त्याचे विरुध्द कोंढवा पोलिस स्टेशन गु.र.नं.८१/२०२४, एन.डी.पी.एस.अॅक्ट कलम ८(क), २२ (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्पुर्वी पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी पथकाचा कार्यभार स्विकारताच पुणे स्टेशन परिसरातून एकास ताब्यात घेऊन त्याचेकडून किं.रु.१,६९,६००/- चा ८ ग्रॅम ४८ मि.ग्र. मॅफेड्रॉन ( एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करून त्याचे विरुध्द बंडगार्डन पो.स्टे. येथे गु.र.नं. २३/२०२४, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित कारवाई ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त, रामनाथ पोकळे, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे सहा पोलिस आयुक्त, गुन्हे २ सतीष गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर, पोलिस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलिस अंमलदार चेतन गायकवाड, योगेश मांढरे, अझिम शेख, साहिल शेख, संदिप जाधव, रविन्द्र रोकडे, महेश साळुंके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे व दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.
नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी…
पुणे शहरात मोबाईल चोरी करणाऱ्यांना युनिट 4ने मुद्देमालासह घेतले ताब्यात…
पुणे शहरात वाहन चोरी करणाऱ्या सराईतास युनिट ६ गुन्हे शाखेने केले जेरबंद…
पुणे शहरात भाजप आमदाराची अजित पवार यांच्यासमोरच पोलिसाला मारहाण…
Video: पुणे मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने वाचवले दोन जीव!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

