माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे याला जामीन मंजूर; तब्बल साडे पाच वर्षांनंतर…

मुंबई : अल्टा माउंटरोड बॉम्बकांड आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे याला मोठा दिलास मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून त्याला जामीन मंजूर झाला आहे. तब्बल साडे पाच वर्षांनंतर तो तुरूंगाबाहेर येणार आहे.

अल्टा माउंट रोडवर स्फोटके ठेवणे तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे याच्यावर गंभीर आरोप आहेत. मुंबई येथील मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सहभाग, खून, पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगारी कट रचणे आदी आरोप त्याच्यावर आहेत. त्याला याच प्रकरणात मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

सुमारे साडेपाच वर्षांपासून तुरूंगात असल्याने दीर्घ कारावासाच्या आधारावर मुंबईतील सत्र न्यायालयाकडून सचिन वाझे याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. दीर्घकाळ कारावासात असल्याचा मुद्दा जामीन देताना न्यायालयाने अधोरेखित केला. जामीन मंजूर झाल्यानंतर सचिन वाझे याच्या तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

सचिन वाझे याच्या जामिनाला न्यायालयाने स्थगिती द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने केली आहे. जामिनाला स्थगिती न दिल्यास हायकोर्टात जाण्याची तयारी एनआयएने दर्शवली आहे.

माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर…

Video! पोलिस अधिकारी IPS अमिताभ गुप्ता यांची विशेष मुलाखत…

पोलिस अधिकारी API अश्विनी बिद्रे प्रकरणी न्यायालयाने सुनावली दोषींना शिक्षा…

Video: सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण यांचा अनोखा छंद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!