हृदयद्रावक! पुणे शहरात विसर्जन मिरवणुकीत ट्रॉलीखाली आल्याने हलगी वादकाचा मृत्यू…

पुणे : पुणे शहरातील घोरपडी येथे विसर्जन मिरवणुकीत ट्रॉलीखाली येऊन हलगी वादकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घोरपडी परिसरातील बी. टी. कवडे मार्गावर शुक्रवारी (ता २५) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विघ्नेश पवार (वय १८, रा. ७ वा मजला, आदिनाथ सोसायटी, रामटेकडी, हडपसर) असे मृत युवकाचे नाव आहे.

मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बी. टी. कवडे मार्गावर गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. यावेळी रामटेकडी येथील हलगी वादक विघ्नेश पवार हा एका गणेश मंडळाच्या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीच्या मागील बाजूस बसला होता. मिरवणूक काळूबाई चौक परिसरात आली असता विघ्नेश हा ट्रॉलीच्या चाकाखाली आल्याची घटना घडली. या अपघातात ट्रॉलीचे चाक त्याच्या छातीवरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

ऐन गणेश विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहाच्या वातावरणात घडलेल्या या भीषण आणि दुर्दैवी अपघातामुळे रामटेकडी व घोरपडी परिसरात अत्यंत शोकाकूल वातावरण पसरले आहे. विघ्नेशच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सोबत वाद्य वाजवणाऱ्या इतर सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. उत्सवाच्या आनंदी वातावरणात अचानक पसरलेल्या या शांततेमुळे स्थानिक नागरिक व गणेशभक्तांमधून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंढवा पोलिसांनी आवश्यक कार्यवाही सुरू केली असून, पुढील तपास करत आहेत.

पुणे पोलिस दलातील हवालदाराचा बंदोबस्तादरम्यान हृदयविकाराने मृत्यू…

पुणे शहरातील 11 पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल; पाहा नावे…

पुणे! विद्यानंद बापट यांचा इम्पॅक्ट, 14 डीजे चालकांवर गुन्हे दाखल…

सण उत्सवासह मिरवणुकीत सार्वजनिक स्थळी फटाके वाजवण्यास बंदी; अन्यथा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!