कोल्हापूर! सोशल मीडियावर फोटो पाहिला आणि गायिकेचा मोबाईल नंबर मिळवल्यावर…

कोल्हापूर: सोशल मीडियावर फोटो पाहिला आणि गायिकेचा मोबाईल नंबर मिळवून थेट कॉल केला आणि पुढे दोघांत मैत्री झाली. जेवायला हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर मद्यपान केलं आणि युवकाने गायिकेवर जबरदस्तीने अत्याचार केले. त्यानंतर गायिकेनं शाहूपुरी पोलिस ठाणं गाठत तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी अक्षय भरत फाळके (वय 33, रा. उजळाईवाडी, ता. करवीर) याला अटक करण्यात आली आहे.

पीडित युवती एका हॉटेलमध्ये गायनाचं काम करत होती. तिची 2017 पासून अक्षय फाळके याच्यासोबत तोंडओळख होती. पुढे पीडित तरुणी ही कामासाठी मुंबईला गेली. त्यानंतर 2025 मध्ये तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहून अक्षय याने तिचा फोन नंबर मिळवला आणि तिला फोन केला. वारंवार संपर्क झाल्यानंतर दोघांत मैत्री झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

अक्षय फाळके याने पुढे युवतीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तिला जेवायला जाऊ म्हणून एका हॉटेलमध्ये नेल्यानंतर तिथे त्यानं मद्यपान केलं आणि नशेत पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर देखील स्वत:च्या कारमधून पीडितेला विविध ठिकाणी नेत पाचवेळा अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

पीडित तरुणीला अक्षय फाळके याची आई, बहीण आणि भाऊ यांनी देखील फोन करून शिवीगाळ केली. तसेच घरात घुसून मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. शाहूपुरी पोलिसांनी आरोपी अक्षय फाळके याला अटक केली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक संतोष डोके, सहायक पोलिस निरीक्षक सीमा शेळके तपास करीत आहेत.

कोल्हापूरमध्ये प्रेमविवाहाचा भयानक शेवट; संशयावरून पत्नीला संपवलं अन् मारला मिशीवर ताव…

कोल्हापूर! प्रेमी युगुलाची घनदाट जंगलात गळफास लावून आत्महत्या…

कोल्हापूर! प्रियकराने केलेल्या माजी सरपंचबाईंच्या हत्येत आला नवा ट्विस्ट…

कोल्हापूर! महाविद्यालयीन युवतीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार; Video बनवला अन्…

कोल्हापूरमध्ये युवतींचे लैंगिक शोषणानंतर बनवले Video; मित्रानेच केला गेम…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!