नागपूरमध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून दोन गुंड रस्त्यावरच एकमेकांना भिडले अन्…

नागपूर: नागपूरमध्ये दोन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकांमध्ये हाणामारी होऊन यामध्ये एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून नरेंद्र नगर येथील सुंदरबन परिसरात गुरुवारी ही घटना घडली. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे नागपूरमध्ये (Nagpur news) एकच खळबळ उडाली आहे.

गौरव रगडे (वय 27) आणि गौरव राऊत या दोघांमध्ये झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला. गौरव रगडे याचे गेल्या दोन वर्षांपासून सुंदरबन येथे राहणाऱ्या सपना या युवतीशी प्रेमसंबंध होते. मात्र, अलीकडच्या काळात सपना आणि गौरव राऊत यांच्यातील जवळीक वाढली होती. गौरव राऊत हा मूळचा यवतमाळच्या दिग्रस येथील आहे. तो सपनासाठी नागपूरच्या नरेंद्र नगर येथे राहायला आला होता. त्याने या भागात भाड्याने एक घर घेतले होते. सपना आणि गौरव राऊत या दोघांनी नरेंद्रनगर परिसरात एक क्लाउड किचनही सुरु केले होते. यामुळे सपनाचा पूर्वीचा प्रियकर गौरव रगडे याला राग आला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

गौरव रगडे याला सपना आणि गौरव राऊत यांच्यातील वाढती जवळीक खटकत होती. गौरव रगडे हा खून, दरोडा, खंडणी यासारख्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असणारा आरोपी आहे. गौरव रगडे याच्या एका मैत्रिणीने नागपूरमधील तरुण उद्योजकाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवले होते. या प्रकरणात गौरव रगडे तुरुंगात गेला होता. काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. यानंतर गौरव रगडेला सपना व राऊत यांच्यातील वाढती जवळीक पाहून त्रास होत होता. या दोघांमध्ये वाद सुरु होता. गुरुवारी हा विकोपाला गेला आणि गौरव राऊत याच्या हातून रगडे याचा खून झाला. या प्रकरणी पोलिसांनी गौरव प्रभाकर राऊत आणि दीपक वासनिक या दोघांना अटक केली आहे.

दरम्यान, गौरव रगडे हा गुरुवारी राऊत याच्या घरी पार्टी सुरु असताना गेला. यावेळी सपनाही तिकडे होती. तिला आणि राऊतला सोबत पाहून गौरव रगडे प्रचंड संतापला. सुरुवातीला गौरव राऊत याने घराचा दरवाजा उघडला नाही. तेव्हा गौरव रगडेने खिडकीच्या काचा फोडल्या. गौरव राऊत दुसऱ्या मार्गाने घरातून निसटला. गौरव रगडेने त्याचा पाठलाग केला आणि हे दोघे नरेंद्र नगरमधील सुंदरबन अंडरपासच्या परिसरात आले. गौरव रगडे याने जवळपास दीड किलोमीटर अंतरापर्यंत राऊतचा पाठलग गेला. सुंदरबन अंडरपासच्या जवळ या दोघांची हाणामारी झाली. जवळपास अर्धा तास हे दोघे एकमेकांना मारत होते. अखेर ही झटापट सुरु असताना गौरव रगडे याच्या कमरेला असणारा चाकू राऊतच्या हाती लागली. त्याने तो चाकू थेट गौरव रगडेच्या छातीत खुपसला. यानंतर गौरव राऊत याने रगडेवर अनेक वार केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

नागपूर हादरलं! एकतर्फी प्रेमातून विवाहित शेजाऱ्याने युवतीला संपवलं अन्…

प्रेमविवाहानंतर दाजीला हॉटेलमध्ये जेवण करत असतानाच संपवलं…

माझ्याशी बोल, तुझ्यावर प्रेम आहे. जर तू बोलली नाहीस, तर…

नागपूर हादरलं! चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीने केली हत्या…

प्रेम! जवानाने मैत्रिणीला भेटायला बोलावले अन् निर्जन स्थळी घेऊन गेला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!