श्रावणी सोमवारी महादेवाचे दर्शन अन् अफवेमुळे गेला ७ महिला भाविकांचा जीव…

पाटणा (बिहार): श्रावणातील सोमवारी बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोक धाम मंदिरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. आज (सोमवार) सकाळी सुमारे ६ वाजून ४० मिनिटांनी मंदिर परिसर आणि अशोकधाम हॉल्टजवळ अचानक चेंगराचेंगरी झाली. यात ७ महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर १२ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणी सोमवारी महादेवाचे दर्शन आणि जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची पहाटेपासून प्रचंड गर्दी जमली होती. मोठी रांग लागली होती. पुरुषांच्या रांगेजवळ अचानक विजेचा एक खांब कोसळला. खांब पडल्याबरोबर विद्युत वाहक तार अंगावर पडल्याची तीव्र अफवा परिसरात पसरली. या भीतीपोटी पुरुषांच्या बाजूने डावीकडे असलेल्या महिलांच्या रांगेवर प्रचंड ढकलाढकली झाली. घाबरलेल्या महिलांची पळापळ झाली आणि त्या एकमेकांवर पडल्या. अवघ्या दोन मिनिटांत ही धक्कादायक दुर्घटना घडली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना तातडीने लखीसराय येथील सदर रुग्णालयात दाखल केले. एसडीपीओ (SDPO) शिवम कुमार यांनी सांगितले की, ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून पोलीस प्रशासन घटनेच्या मूळ कारणाचा सखोल तपास करत आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेवर बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी तीव्र दुख व्यक्त केले आहे. जखमींवर योग्य आणि त्वरित उपचार करण्याचे स्पष्ट निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.

अशोक धाम मंदिरात अशा प्रकारची दुर्घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १२ ऑगस्ट २०१९ रोजी (श्रावणातील शेवटच्या सोमवारी) येथे झालेल्या चेंगराचेंगरीत एका ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता आणि तसेच ८ ते १० भाविक गंभीर जखमी झाले होते.

Video: अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी, 33 जणांचा श्वास गुदमरून मृत्यू…

गोव्यात धार्मिक मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरी; 7 जणांचा मृत्यू…

महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत अनेकांचा गुदमरून मृत्यू…

दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी; कुंभस्नानासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा मृत्यू…

हाथरस चेंगराचेंगरी! सत्संगवाला भोले बाबाच्या वहिनीने केला खुलासा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!