
प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा म्हशीच्या गोठ्यात आवळला गळा अन्…
कोल्हापूर : प्रियकराने लग्नासाठी तगादा लावल्याने माजी सरपंच महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरेखा शिवाजी न्यारे असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, त्या शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या माजी सरपंच होत्या. या खून प्रकरणी संशयित प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील याला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे.
प्रियकराने शिरगाव येथे खून केल्यानंतर आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतःच्याच गाडीतून मृतदेह भिवंडीकडे घेऊन जात होता. पोलिसांनी गाडी पकडल्यानंतर खून केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील (वय ४०, रा. शिरगाव, ता. शाहूवाडी) याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेबाबत संदेश सर्जेराव मोरे (वय २७, रा. भिवंडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
View this post on Instagram
शिरगावच्या माजी सरपंच सुरेखा न्यारे या आरोपी प्रकाश पाटील याच्या घराशेजारीच राहत होत्या. गेल्या काही दिवसांपासून सुरेखा या प्रकाशकडे लग्नासाठी तगादा लावत होत्या आणि त्याला धमकावतही होत्या. या त्रासाला कंटाळून रविवारी (ता. २६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास शिरगाव येथील ‘लिडोंरीचा वाड्या’जवळ असलेल्या म्हशीच्या गोठ्यात प्रकाशने सुरेखा यांचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर घटनेचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी प्रकाश स्वतःच्या चारचाकी गाडीतून सुरेखा यांचा मृतदेह भिवंडीच्या दिशेने घेऊन जात होता. मात्र, भिवंडीजवळ पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ही गाडी अडवली. गाडीची तपासणी आणि चालकाची चौकशी केली असता हत्येचा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे! प्रियकराने चार मित्रांच्या हवाली केलं मैत्रिणीला अन् कधी लॉज तर कधी…
नाशिक! वैष्णवी आवारे हत्येचा उलगडा; प्रियकराला दुसऱ्यासोबत लग्न जमल्याचा राग…
विवाहितेने प्रियकराच्या मदतीने काढला नवऱ्याचा काटा, सीसीटीव्हीने भांडाफोड…
प्रियकराच्या सांगण्यावरून नर्सने केला नवऱ्याचा सलाईनमधून क्रुर मर्डर…
प्रियकर सक्षमचं घर का सोडलं? आंचलने सांगितलं धक्कादायक कारण…

