पुणे! गुंड निलेश घायवळ टोळीतील टोळक्याने केले युवकावर सपासप वार…

पुणे : कोथरूडमध्ये एका मोबाईल दुकानात काम करणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी या युवकाने कुख्यात गुंड निलेश घायवळ विरोधात तक्रार दिली होती अशी माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

अमित शिंदे हा कोथरूडमधील एका मोबाईल दुकानात काम करत होता. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तो दुकानाबाहेर उभा असताना अचानक आठ ते दहा जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी अमितवर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीतील युवकांनी केल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संपूर्ण घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. कोथरूड पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून, त्याच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, कुख्यात गुंड निलेश घायवळ सध्या लंडनमध्ये लपून बसला आहे. तिथून तो आपलं नेटवर्क चालवत आहे. निलेश घायवळच्या भावाला पुणे पोलिसानी राजस्थानमधून अटक केली होती. अशातच आता निलेश घायवळ याला देखील कधी अटक होणार? असा सवाल विचारला जात आहे.

निलेश घायवळ याच्या भावाला राजस्थानमधून अटक, मंदिरातील प्रसादावर…

कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या थोबाडीत मारणाऱ्या पैलवान सागर मोहोळकरचा मृत्यू…

निलेश घायवळ गँगच्या सदस्याला अटक; धक्कादायक माहिती समोर…

निलेश घायवळ याची ‘8055 BOSS’ अशी नंबर प्लेट असलेली गाडी जप्त…

गँगस्टर निलेश घायवळ पळाला स्विझर्लँडला, पुणे पोलिसांनी आवळल्या नाड्या….

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!