
मोठी बातमी! नसरापूर प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल…
पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावामध्ये एका साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून याचा निकाल आज (गुरुवार) समोर आला आहे. पुण्यातील विशेष न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
१ मे २०२६ रोजी घडलेल्या या भयानक घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची तीव्र लाट उसळली होती. या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत विक्रमी वेळेत १,२०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. साक्षीदारांच्या साक्षी, उलटतपासणी आणि दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आज २५ जून रोजी निकाल जाहीर केला आहे.
View this post on Instagram
१ मे २०२६ रोजी नसरापूर परिसरातून साडेतीन वर्षांची चिमुकली अचानक बेपत्ता झाली. काही वेळानंतर तिचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा संशय बळावला. यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक गुप्त माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मुख्य संशयित भीमराव कांबळे ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले. अखेर आता या प्रकरणाचा निकाल समोर आला आहे.
चिमुरडीचा शवविच्छेदन आणि न्यायवैद्यकीय तपासणी अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. पोलिसांनी घटनास्थळावरील नमुने, कपडे आणि इतर महत्त्वपूर्ण भौतिक पुरावे जप्त केले. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला थेट घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्निर्मिती केली. त्याचे ‘डीएनए’ (DNA) नमुने, साक्षीदारांचे जबाब आणि इतर शास्त्रीय आणि वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात आले.
न्यायालयाने आरोपी भीमराव कोंबळे याला सीसीटीव्हीमध्ये लहान मुलगी घटनास्थळाकडे तुझ्यासोबत जाताना दिसतेय आणि काही वेळाने तू एकटाच परतताना दिसतोयस, अशी विचारणा केली होती. त्यावर आरोपीने ‘तो मी नाही’ असा कांगावा केला. परंतु, व्हिडिओ झूम करून दाखवताच त्याने मान्य केले. स्वतःचा बचाव करताना आरोपी न्यायालयात म्हणाला, “घटनेच्या दिवशी मी शेतात गेलो होतो, तिथे ती मुलगी आली. तिला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला आणि आम्ही पडलो. त्यामुळे मुलीच्या डोक्याला मार लागला आणि ती मोठ्याने रडू लागली. ती रडत असल्याने मी तिला खाटेवर झोपवले. मात्र, तिच्या रडण्याचा आवाज ऐकून लोक जमा होतील आणि माझ्यावरच आरोप करतील, या भीतीने मी तिला तिथेच सोडून कट्ट्यावर जाऊन बसलो.”
पुणे! नसरापुरातील आरोपी म्हणाला; मुलीला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला अन्…
पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरणात धक्कादायक माहिती कोर्टासमोर…
पुणे! नसरापूर प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा सीसीटीव्हीत कैद…
नसरापूर प्रकरण! CCTV फुटेजमुळे वाढलं गुढ; गाठोड्यात नेमकं काय…
पुणे! नसरापूरमधील मुलीचा शवविच्छेदन अहवाल समोर; आरोपीने काय केले पाहा…
संतापाची लाट! नसरापुरातील आरोपीने कोंबड्या, बकऱ्यांनाही सोडले नाही…

