
राज्यातील 13 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी…
मुंबईः महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, लातूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस आणि सुरक्षा विभागांमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे.
फेरबदलामध्ये काही अधिकाऱ्यांच्या 21 मे रोजी झालेल्या बदल्या रद्द करून त्यांना नवीन पदस्थापना देण्यात आली आहे, तर काही प्रतीक्षाधीन अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांसोबतच गृह विभागाने राज्य पोलीस सेवेतील (SPS) वरिष्ठ अधिकाऱ्याचीही बदली केली आहे. श्रीमती भागीरथी भरत पवार : यांची ‘सहायक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर शहर’ या पदावरून ‘पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, लातूर’ या पदावर प्रशासकीय कारणास्तव तत्काळ प्रभावाने बदली करण्यात आली आहे.
View this post on Instagram
गृह विभागाने जारी केलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, पोलीस महासंचालक कार्यालय, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरण (CAT)/न्यायालयाचे आदेश, कायदा व सुव्यवस्था तसेच आगामी काळातील प्रशासकीय समन्वय लक्षात घेऊन पोलीस आस्थापना मंडळ क्र. 1 च्या शिफारशीनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. या फेरबदलामुळे एटीएस (ATS), एसआरपीएफ (SRPF), महामार्ग सुरक्षा आणि रेल्वे पोलीस दलाला नवीन आणि अनुभवी नेतृत्व मिळाले आहे.
गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार बदल्या झालेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांची नवीन पदस्थापना खालीलप्रमाणे…
| अ.क्र. | आयपीएस अधिकाऱ्याचे नाव | विद्यमान पदस्थापना | बदलून मिळालेले नवीन पद |
| १. | अरविंद चावरिया | प्रतीक्षाधीन | पोलीस उप महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल (SRPF), मुंबई |
| २. | विनिता साहू | पोलीस उप महानिरीक्षक, SRPF, मुंबई | अपर पोलीस आयुक्त, नागपूर |
| ३. | अरविंद साळवे | सह संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक | पोलीस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक (ATS), मुंबई |
| ४. | श्रीकांत परोपकारी | उपायुक्त, सागरी सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई | पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई |
| ५. | श्रीकृष्ण कोकाटे | प्रतीक्षाधीन | पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), नांदेड |
| ६. | अमरसिंह जाधव | पोलीस उपायुक्त, ठाणे शहर | २१.०५.२०२६ ची बदली रद्द करून, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर येथेच कायम |
| ७. | अमोल झेंडे | पोलीस अधीक्षक, पीएमआरडीए (PMRDA), पुणे | २१.०५.२०२६ ची मिरा भाईंदर वसई विरार येथील बदली रद्द करून, पोलीस अधीक्षक, PMRDA, पुणे येथेच कायम |
| ८. | निलेश सोनावणे | पोलीस उपायुक्त, वायरलेस कोस्टल डिव्हिजन, नवी मुंबई | २१.०५.२०२६ ची बदली रद्द करून, पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे |
| ९. | रुपाली आंबुरे | पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे | पोलीस अधीक्षक, डायल-११२, नवी मुंबई |
| १०. | संदीप पालवे | पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), नांदेड | पोलीस अधीक्षक, छ. संभाजीनगर (लोहमार्ग) |
| ११. | स्वाती भोर | समादेशक, राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्र. १२, हिंगोली | प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, तासगाव (सांगली) |
| १२. | कविता नेरकर | पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई | समादेशक, राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्र. १४, छ. संभाजीनगर |
| १३. | वैशाली माने | पोलीस अधीक्षक, रा.गु.अ. (SID), पुणे | पोलीस उपायुक्त, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय |
महाराष्ट्र पोलिस दलात मोठा फेरबदल; अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…
राज्यात पोलिस दलात मोठे बदल; 24 बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

