कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…

नाशिक : ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या कॅ. अशोक खरात याची काळीकृत्ये लोकांसमोर आली आहेत. एका महिलेने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याचे काळे धंदे समोर येऊ लागले आहेत.

कॅप्टन अशोक खरात याला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कॅप्टन खरात याचा एका महिलेसोबतचा अत्यंत आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला आहे. कॅप्टन थोरात याच्या दालनाबाहेर शेकडो लोकांची गर्दी असताना दालनामध्ये एका महिलेसोबत पूजा करण्याचे नाटक करून तो अत्यंत आक्षेपार्ह कृत्य करीत असल्याचे दिसून येत आहे.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

महिलेच्या तक्रारीनंतर कॅप्टन अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी रात्री उशिरा नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. अनेक राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील महत्त्वाचे लोक खरात याच्याकडे भविष्य पाहायला जायचे. अनेक राजकीय नेत्यांसोबत खरात याचे घनिष्ठ संबंध आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या अशोक खरात याच्या संस्थेवर सदस्य आहेत.

एक महिला कॅप्टन खरात याच्याकडे कौटुंबिक समस्या घेऊन येते. त्यावर धार्मिक विधी करण्याचे नाटक करून तो महिलेला आपल्या जवळ ओढून घेत असल्याचे दिसते. एवढ्यावरच न थांबता त्याने काही मिनिटांच्या व्हिडीओत अनेक आक्षेपार्ह कृत्ये करतो. विशेष बाब म्हणजे खरात याच्या दालनाबाहेर अनेक लोक थांबलेले असताना, त्यांची पर्वा न करता तो चाळे करण्यात गुंग होता.

कॅप्टन खरात याने महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवून पूजा करण्याचे नाटक केले. धार्मिक विधीचे ढोंग करीतच त्याने महिलेशी गैरवर्तन केले. संबंधित व्हिडीओ खूपच आक्षेपार्ह असल्याने तो दाखवता येऊ शकत नाही. हा व्हिडीओ २०२४ मधील असल्याचे सांगण्यात येत आहे. अशोक खरात याच्याकडे अत्यंत आक्षेपार्ह असलेले महिलांचे ५८ व्हिडीओ सापडल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवार रात्री अटकेची कारवाई झाल्यानंतर पोलिसांनी जप्त केलेल्या पेनड्राईव्हमधून ५८ व्हिडीओ पोलिसांच्या हाताला लागल्याची माहिती पुढे आली आहे.

नाशिक! भोंदूबाबाची महिलेली धमकी; माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर…

पुणे शहरात भोंदूबाबाने महिलेला फसवलं; सोन्याच्या हंड्यात निघाली माती…

पुणे! भोंदूबाबाचे अश्लील चाळे; चिठ्ठीवर तारीख लिहायचा अन्…

भोंदूबाबाने अल्पवयीन मुलींना नग्नावस्थेत पुजेला बसावे लागेल सांगून केले लैंगिक शोषण…

भोंदूबाबा महिलेला काही टेन्शन घेऊ नकोस असं म्हणाला अन् खोलीमध्ये गेल्यावर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!