
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची पटली ओळख…
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर आज (दि.27) एका महिलेने हल्ला केला होता. त्यानंतर मंत्रालय परिसरात खळबळ उडाली होती. ही महिला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते. संबंधित महिलेची ओळख पटली असून, धनश्री सहस्रबुद्धे असे नाव आहे.
संबंधित महिला दादरमधील रामगिरी या इमारतीमध्ये राहते. ही महिला सोसायटीमध्येही चाकू घेऊन फिरते. तसेच नागरिकांच्या दारांवर झाडूही मारते. या महिलेचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. यापूर्वीही ही महिला मंत्रालयात सातत्याने येते. धनश्री सहस्रबुद्धे या महिलेची मानसिक स्थिती नीट नसल्याची माहिती आहे. तसेच मॅजिस्ट्रेट कोर्टाने महिलेला मनोरुग्णालयात दाखल करण्याचे आदेशही दिल्याची माहिती समोर आली आहे.
धनश्री सहस्त्रबुद्धे ही महिला घरी एकटीच राहते. आई वडिल काही वर्षापुर्वीच मरण पावले आहेत. बहीण लग्न करून निघालेली आहे. सदर महिलेने काल रात्री इमारतीच्या लिफ्टचा दरवाजा तोडला आहे. पोलिसांकडून महिलेचे समुपदेशन करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पोलिसांना जबाब देण्याकरीता महिला तयार नाही. सदर महिला दरवाजा उघडत नसल्याने पोलिसांची अडचण झाली होती. महिला पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले आहे. महिला मेंटली डिस्टर्ब असल्याचे दादरमधील रहिवाशांचे म्हणणे आहे.
संबंधित महिला यापूर्वी सुद्धा मंत्रालयात अनेकदा आली होती. मला सलमान खानचा फोन नंबर द्या, लग्न करायचे आहे, अशी मागणी ती करीत असते. अनेक राजकीय नेत्यांना ती सातत्याने फोन करुन सलमानचा नंबर मागते. यापूर्वी भाजपा कार्यालयात जाऊनही तिने धमकावले होते, त्याची रितसर तक्रार त्यावेळी करण्यात आली होती.
मंत्रालयातील पोलिसांवर कारवाई होणार?
सचिव गेटने ही महिला पास न घेता जात असताना या महिलेला अडवल का नाही? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या बाहेर चार पोलिस नेहमी तैनात असतात मग यावेळी पोलिस का उपस्थित नव्हते? असे सवाल सध्या उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या दोन्ही पॉईंटची जबाबदारी असलेल्या पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
पोलिस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती…
पुणे पोर्श अपघात प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं ए टू झेड…
ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसकाकाचा लोकलमधून पडून मृत्यू….
पोर्न स्टार रिया बर्डे हिला पोलिसांनी केली अटक; धक्कादायक कारण…
पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…

