राज्य सरकारकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश…

मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (ता. 28) बारामती जवळ विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. अजित पवार यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून तीन दिवस शासकीय दु:खवटा पाळण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर बारामती पोलीसांना अपघातस्थळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने आधीच या अपघातस्थळी जाऊन नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. हा तपास करताना बारामती पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तपास करण्यात येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

सरकारच्या प्राथमिक अहवालात…
सदर विमान 28 जानेवारी रोजी सकाळी 8.18 वाजता पहिल्यांदा बारामतीच्या संपर्कात आले. या अहवालानूसार वैमानिकांना सांगण्यात आलं की सध्या वारा फार नाही आणि दृश्यमानता साधारण 3000 मीटर इतकी आहे. त्यानंतर विमानातील पायलटने सांगितलं की ते रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत आहेत. पण त्यांना रनवे दिसत नाही. नंतर पायलटने पुन्हा एटीसीला सांगितलं की रनवे दिसू लागला की सांगतो. त्यानंतर 8.43 वाजता रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला. मात्र पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले, असे एटीसीवर काम करत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Police-Book

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम…
पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.
बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे
ILS (Instrument Landing System) सुविधा नाहीत.
पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.
विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.
याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला.
धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.
दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.
DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.
लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.
सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला
रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले
आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
विमानात भीषण आग लागली
आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही
अपघाताचा तपास चालू आहे; DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल.

अजित पवार यांची सावलीही अनंतात विलीन; विदीप जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार…

दादा मिश्किलीने म्हणाले, ‘आयला गडबड झाली, आता चोरांना पॉश लॉक अप…

अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचा विमान अपघातात मृत्यू; ओळख पाहा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!