
नाशिक! अंबड पोलीस ठाण्याने वाहनांच्या फसवणुकीचा गुन्हा केला उघड…
नाशिक (गणेश शेंडे) : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत दोन चारचाकी वाहनांच्या फसवणुकीचा गुन्हा उघड केला असून, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
फिर्यादी अदिती नितेश भामरे (वय २८, रा. सिडको, अंबड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी लोकेश कुंदन गाजरे व त्याची आई यांनी संगनमत करून त्यांच्या विश्वासास पात्र ठरत Renault Kiger Rxz (MH-15 JM-6019) व टाटा टियागो (MH-15 JH-6876) ही दोन कार लग्नाच्या कारणास्तव उधार घेतली. मात्र, त्यानंतर त्यांनी त्या गाड्या परत केल्या नाहीत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सपोनि विलास पडोळकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भुसावळ येथे सापळा रचून आरोपी लोकेश कुंदन गाजरे (वय २४) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दोन्ही गाड्या गोलू सोनार व हर्षल पाटील यांच्याकडे गहाण ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली.
संबंधित कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-२) किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सपोनि विलास पडोळकर, पो.हवा. योगेश देसले, पोशि सचिन करंजे, अनिल गाढवे, संजय सपकाळे, वैभव एखंडे, फरिद इनामदार, मयुर पवार, राकेश पाटील, दीपक निकम अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे कारवाई केली.
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!
श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!
वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!
अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!
गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!

