हृदयद्रावक! आई वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं अन् बहिणीची पण सोडली साथ…

सोलापूर: दक्षिण सोलापूर येथील विंचूरमध्ये एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लहानपणी आई वडिलांचं छत्र हरपल्यानंतरही ती जिद्दीने आपलं शिक्षण पूर्ण करत होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

श्रेया पुंडलिक गायकवाड (वय १८) असे आत्महत्या युवतीचे नाव आहे. आपल्या बहिणीसोबत ती राहत होती. मृत श्रेया आणि तिची बहीण स्नेहल यांच्या डोक्यावरील आई वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं होतं. पण दोघी बहिणी खचून न जाता जिद्दीने शिक्षण घेत होत्या. श्रेयाच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मंद्रूप पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

श्रेया आणि तिची मोठी बहीण स्नेहल या दोघी कॉलेजला जाण्यासाठी सोलापूरला निघाल्या होत्या. मात्र जेवणाचा डबा घरी विसरल्याने त्या दोघी पुन्हा घरी आल्या. घरी आल्यानंतर मोठी बहीण स्नेहल ही बाहेर बाथरूमला गेली. तेव्हा श्रेयाने घरामध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेतला. राहत्या घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मोठी बहीण स्नेहल थोड्या वेळात घरी आली. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. आवाज दिला तरी तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे स्नेहलने खिडकीतून डोकावून पाहिले. तर श्रेया पंख्याला लटकत असल्याचे तिला दिसले. हा प्रकार पाहिल्यानंतर तिने घराशेजारील चुलत भावांना ओरडून याची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून दरवाजा तोडला. एका खाजगी वाहनातून तातडीने बेशुद्धावस्थेत श्रेयाा मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालय आणले. पण तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. श्रेयाने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप समोर आले नाही. मंद्रुप पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास केला जात आहे.

हृदयद्रावक! पुणे-सोलापूर महामार्गावर दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू…

हृदयद्रावक! ट्रॅक्टरच्या गिअरवर पडला पाय अन् दोन बहिणींचा चिरडून मृत्यू…

हृदयद्रावक! गर्भवती विवाहितेने उचचलं टोकाचं पाऊल; धक्कादायक कारण…

धक्कादायक! सोलापूरमध्ये महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या…

हृदयद्रावक! आईसमोरच लेकराचा जागीच अपघाती मृत्यू तर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!