लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण यांना अटक…

नाशिकः पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून लष्करी गणवेशात ठिकठिकाणी आंदोलन करत होते. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हिडिओमधून चंदू चव्हाण यांचा आक्रोश पाहायला मिळत होता. नाशिकमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, नाशिक पोलिसांनी चंदू चव्हाण यांना गुरुवारी (ता. १०) अटक केली आहे. चंदू चव्हाण यांना आज (शुक्रवार) न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

चंदू चव्हाण यांना धुळे पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. संबंधित मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवाय, संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील काय कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण यांच्या मागण्यात आहेत तरी काय?

दरम्यान, चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ महिने २१ दिवस होते. भारत सरकाने त्यांची सुखरूप सुटका केली. पण, लष्करामधून त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. लष्कराच्या वरिष्ठांकडून सतत आरोप प्रत्यारोप करत चौकशी लावल्या गेल्या. भारतात आल्यानंतर वरिष्ठांकडे या संदर्भात पत्र व्यवहार देखील केला. मी पाकिस्तान कसा आणि कशासाठी गेलो होतो, हे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगावे म्हणजे जनतेला समजेल तरी. यानंतर माझ्या आक्रोशाचे कारण समजेल. लष्कराने जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, ही प्रमुख मागणी आहे. लष्करातून काढल्यानंतर पेन्शन नाही, नोकरी मिळत नाही मग करायचे काय? असा सवालही चंदू चव्हाण त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, चंदू चव्हाण हे मुळचा धुळे जिल्ह्यातील आहेत. ते 3 महिने 21 दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होता. भारत सरकारने केलेल्या जोरदार प्रयत्नानंतर सुटका करण्यात आली होती. ज्या वेळी ते धुळ्यात परत आले, त्यावेळी त्याचं जंगी स्वागत करण्यात आले होते. परंतु, धुळे शहरातच त्यांना मारहाण झाल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

माजी जवान चंदू चव्हाण यांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

जवान चंदू चव्हाण यांचे धुळ्यात भीक मागो आंदोलन; गळ्यात पाटी, पाटीवर स्कॅनर…

Video : लष्करातील जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यांवर मागत आहेत भीक…

Video: चंदू चव्हाण यांचे उपोषण तात्पुरते स्थगित; मदतीचे आवाहन…

Video: जवान चंदू चव्हाण यांचे मुंबईत आमरण उपोषण; सरकारचे दुर्लक्ष…

जवान चंदू चव्हाण करणार सहकुटुंब आत्मदहन!

पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…

सीमा हैदर करणार राजकारणात प्रवेश? RPI पक्षाकडून…

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!