
पुणे कोंढवा प्रकरणात नवा ट्वीस्ट, प्राध्यापिकेची एन्ट्री…
पुणे: पुणे शहरातील कोंढवा येथील उच्चभ्रू सोसायटीमधील युवतीने दाखल केलेल्या खोट्या अत्याचाराच्या तक्रारीत नवा ट्वीस्ट आला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. तर, दुसरीकडे या खोट्या तक्रारीनंतर पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत फेक नरेटिव्ह पसरवले जात असल्याचे पोलिस आयुक्तांनी म्हटले आहे.
कोंढव्यातील युवतीने घरात घुसून लैंगिक अत्याचार झाल्याची खोटी तक्रार दिल्यामुळे पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे, असा चुकीचा संदेश पसरवला जात आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. अमितेश कुमार यांनी रविवारी सिंहगड रोड पोलिस स्टेशन अंतर्गत एका नवीन पोलिस चौकीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात हे वक्तव्य केले. खोटी तक्रार दाखल करण्यापूर्वी तिने आपल्या प्राध्यापिकेकडून मार्गदर्शन घेतल्याचा संशय आहे.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
युवतीने आपल्यावर एका कुरिअर बॉयने अत्याचार केल्याची तक्रार नोंदवली होती. अत्याचार केल्यानंतर या तरुणाने तिच्या मोबाइलमध्ये सेल्फी काढत पुन्हा येणार असल्याचे तक्रार तरुणीने केली. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवली. अखेर 24 तासात ही तक्रार खोटी असल्याचे समोर आले. तक्रारदार युवतीने अनेक गोष्टी पोलिसांपासून लपवले असल्याचेही समोर आले.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘या प्रकरणात महिलेची संमती होती, हे आम्ही सिद्ध केले आहे. महिलेने तिच्या एका मित्राला घरी बोलावले होते. सेल्फी तिच्या संमतीने काढण्यात आला, जो तिने नंतर एडिट केला. एक अनोळखी कुरिअर डिलिव्हरी करणारा माणूस घरात आला, असे खोटे सांगितले. दुसरे म्हणजे, तिने सांगितले की, घरात जबरदस्तीने प्रवेश करण्यात आला आणि तिच्यावर बलात्कार करण्यापूर्वी स्प्रे वापरण्यात आला, हे देखील खोटे ठरले. दोघांमध्ये काही वाद झाले होते, त्यानंतर महिलेने खोटी तक्रार दाखल केली असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती त्यांनी दिली. महिलेने तक्रारीत वारंवार बदल केले. त्यामुळे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवण्यात आला. तसेच, तिला आणि तिच्या मित्राला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. या घटनेमुळे पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, असा चुकीचा संदेश पसरवला गेला आहे. या तक्रारदार मुलीला समुपदेशनासाठी पाठवण्यात आले आहे.’
कोंढवा पोलिसांनी सांगितले की, ‘त्यांनी एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांचा जबाब नोंदवला आहे. या प्राध्यापिका महिलेच्या तक्रारीपूर्वीपासून तिच्या संपर्कात होत्या. प्राध्यापिका तक्रारदार महिलेची मैत्रीण आणि मार्गदर्शक आहे. तक्रार दाखल करण्यापूर्वी तिने प्राध्यापिकेकडून मार्गदर्शन घेतले होते, असे समोर आले आहे. तक्रार कशी दाखल करावी आणि तपास अधिकाऱ्यांशी कसे बोलावे, याबद्दल तिने प्राध्यापिकेकडून माहिती घेतली होती. जर गरज पडली, तर आम्ही प्राध्यापिकेला पुन्हा चौकशीसाठी बोलावू. आम्ही या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून महिला प्राध्यापकांचा जबाब नोंदवला आहे.’
पुणे! कोंढवा प्रकरणातील युवक-युवतीची समोरासमोर बसून केली चौकशी…
पुणे! म्हातारा रिसेप्शनिस्ट युवतीला म्हणाला; मला एक पप्पी दे, तुला जे हवं ते देतो…
पुणे शहरात धक्कादायक प्रकार उघड; पैशासाठी 40 दिवसांच्या लेकराला विकलं…
पुणे! कोंढव्यातील पीडित युवतीने पोलिसांनाच केला उलट प्रश्न अन् अडकली…
पुणे हादरलं! कुरिअर बॉय असल्याचे सांगून युवतीच्या तोंडावर स्प्रे मारून केला बलात्कार…
IT कर्मचाऱ्याने महिला सहकाऱ्यांचा चोरून बनवला व्हिडिओ; मोबाईलमध्ये क्लीप…
पुणे! भोंदूबाबाच्या आश्रमातून वेगवेगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या जप्त…
ऑफिस पार्टीत युवतीने केले मद्यसेवन अन् सहकाऱ्याने केला बलात्कार…
पुणे शहरात चिमुकलीवर लॉजवर बलात्कार; आरोपीसह लॉज मालकही अटकेत…
पुणे! विद्येच्या माहेरघरात युवतीवर केला बलात्कार…
पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….
पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…
पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

