
Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…
लंडन: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. भारताबरोबरच परदेशातही याचे पडसाद उमटत आहेत. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्त भारतीय विद्यार्थ्यांनी लंडनमध्ये पाकिस्तानी दूतावासासमोर देखील आंदोलन केले आहे.
यापाकिस्तानी डिप्लोमॅटच्या कृत्यानं संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. विद्यार्थी आंदोलन करत असताना पाकिस्तानी कर्नल तैमूर यांनी बाल्कनीत उभे राहून भारतीय आंदोलकांकडे पाहून थेट आपल्या गळ्यावरून अंगठा फिरवत, गळा कापू अशा प्रकारचा इशारा केला आहे. या कृत्यातून कर्नल तैमूर यांनी भारतीय आंदोलकांना डिवचण्यचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार आंदोलकांच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे.
लंदन में भारतीय लोग पाकिस्तानी दुतावास के बाहर पहलगाम हमले के खिलाफ प्रदर्शन कर रहे थे
तब कर्नल तैमूर राहत जो ब्रिटेन में पाकिस्तान का मिलिट्री अटैशे है उसने दूतावास की बालकनी पर आकर भारतीयों को अभिनंदन की तस्वीर लेकर उनका गला काटने का इशारा किया #PahalgamTerroristAttack pic.twitter.com/tY7f17cUQb
— Sachin Panwar (@ChowdharyPanwar) April 26, 2025
संबंधित व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तैमूर यांच्या हातात यावेळी भारतीय लष्करी अधिकारी अभिनंदन यांचा फोटो असणारे पोस्टरही पाहायला मिळाले. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
लंडनमध्ये पाकिस्तानी दूतावासाबाहेर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने भारतीय नागरिकांनी हातात निषेधाचे फलक आणि राष्ट्रध्वज घेत निषेध व्यक्त केला. यावेळी पाकिस्तानी अधिकाऱ्याची ही कृती टीकेची धनी ठरली आहे.
VIDEO | Indian community stages protest outside the Pakistan High Commission in London against the Pahalgam terror attack that took 26 innocent lives.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/QDGnm7vPBl
— Press Trust of India (@PTI_News) April 26, 2025
पहलगामच्या दहशतवाद्यांबाबत मॉडेल एकता तिवारी हिने केला खळबळजनक दावा…
पहलगाममधील दहशतवाद्यांच्या घरात धडाधड झाले मोठे स्फोट…
पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…
भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…
विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…
Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…
Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…
Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…
Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…
Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…
Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

