पहलगामच्या दहशतवाद्यांबाबत मॉडेल एकता तिवारी हिने केला खळबळजनक दावा…

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन 26 भारतीय पर्यटकांचे जीव घेतले होते. या दहशतवाद्यांची रेखाचित्रं जारी करण्यात आली असून त्यांची माहिती देणाऱ्यांना 20 लाख रुपयांच्या इनामाची घोषणा करण्यात आली आहे. काश्मीरला काही दिवसांपूर्वी फिरायला गेलेली मॉडेल एकता तिवारी हिने या दहशतवाद्यांशी आपले भांडण झाले होते, असा दावा केला आहे.

एकता तिवारी हिने सांगितले, ‘काश्मीरला आमचा 20 जणांचा फिरायला गेला होता. आम्ही काश्मीरमध्ये वेगवेगळ्या भागात फिरत असताना 20 एप्रिलला आम्ही पहलगामला पोहोचलो. त्यादिवशी आम्हाला आमच्यासोबत असणारा खेचरांचा मालक आणि त्याच्यासोबत असणाऱ्या दोन जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. यामुळे त्यांचा व्हिडीओही शुट करुन ठेवला होता. ते आम्हाला कुराण का वाचत नाही, असे विचारत होते. तसेच माझ्या भावाच्या गळ्यात असलेली रुद्राक्षाची माळ पाहून त्याने वाद घातला होता. हा खेचर स्वार पोलिसांनी जारी केलेल्या रेखाचित्रातील दहशतवाद्याशी मिळताजुळता आहे.’

संबंधित खच्चर स्वारासोबत दोन अनोळखी व्यक्तीही होते. ते मला अजमेर दर्ग्याविषयी विचारत होते. मग त्यांनी मला अमरनाथ यात्रेविषयी विचारले. तुम्ही किती लोक आहात, कोणत्या धर्माचे आहात, असे प्रश्न ते सतत विचारत होते. त्यांना आम्हाला बैसरन व्हॅलीत न्यायचे होते. मात्र, त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने आम्ही बैसरन व्हॅलीला जाण्याआधीच थांबलो. त्यानंतर त्यांनी आमच्याशी हुज्जत घातली. आमच्याकडे त्याचे व्हिडीओ आहेत. एकता तिवारी हिने यानंतर सीएम हेल्पलाईन 1076 या क्रमांकावर फोन करुन ही माहिती पोलिसांना दिली.

‘आमचा खच्चर स्वार हा दहशतवादी असू शकतो. त्याच्याकडे एक लहानसा किपॅडवाला फोन होता. तो वारंवार या फोनवर बोलत होता. बोलून झाल्यावर तो फोन बुटाजवळील मोजात लपवत होता. मी त्याला फोनवर बोलताना ऐकले होते. तो खोऱ्यात 35 बंदुका पाठवण्यासंदर्भात बोलत होता. यावेळी त्याने फोनवर कोणालातरी प्लॅन ए फेल झाल्याचेही सांगितले. ब्रेक फेल झाले नाहीत. हा त्यांचा प्लॅन ए होता. त्यामुळे बैसरन व्हॅलीतील हल्ला हा दहशतवाद्यांचा प्लॅन बी असावा, असा संशय एकता तिवारी हिने व्यक्त केला आहे.

पहलगाममधील दहशतवाद्यांच्या घरात धडाधड झाले मोठे स्फोट…

पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…

भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…

विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…

Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…

Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…

Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…

Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!