भीषण अपघात! नांदेडमध्ये मजुरांनी भरलेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, 8 जणांचा मृत्यू…

नांदेड: नांदेड शहराजवळ असलेल्या आलेगाव परिसरातून शेजमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरमध्ये शेतकरी महिला मजूर होत्या. त्या हळद काढण्यासाठी जात होत्या.यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नांदेड शहराजवळच्या आलेगाव शिवरात ही घटना घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या गुंज गावातील काही शेतकरी महिला मजूर आलेगाव शिवारात हळद काढायला आल्या होत्या. ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. ग्रामस्थांनी दोन महिलांसह एका पुरुषाला विहिरीतून बाहेर काढले आहे. मात्र अद्याप सात ते आठ जण विहिरीत अडकल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. हिंगोलीसह नांदेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे ट्रॅक्टर पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. ट्रॅक्टर मध्ये नेमके किती जण होते, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण पाण्याने भरलेल्या विहिरीत ट्रॅक्टर पडल्याने इतर सर्वजणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस घटनास्थळी ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य करत आहेत. मजुरी करण्यासाठी आलेल्या महिलांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सांगलीत भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी…

महाराष्ट्रात भीषण अपघात! वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून 5 कामगारांचा झोपेतच मृत्यू…

नाशिकमध्ये भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू; 3 गंभीर जखमी…

कर्नाटकमध्ये भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू; मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश…

भीषण अपघात! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तीन युवकांना एसटी बसने चिरडले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!