
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी काढली छेड…
जळगाव : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेड काढली आहे. मुक्ताईनगरच्या यात्रा महोत्सवात रक्षा खडसे यांची मुलगी मैत्रिणींसोबत गेली होती. यावेळी काही टवाळखोरांनी तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनाविरोधात तिचे फोटो, व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचीच छेडछाड झाल्याने खरंच महाराष्ट्रात मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे. हाच प्रश्न रक्षा खडसे यांनीही उपस्थित केला आहे.
रक्षा खडसे यांनी सांगितले की, ‘मुक्ताईनगरमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने यात्रा असते. त्या यात्रेच्या निमित्ताने माझी मुलगी आणि तिच्या मैत्रिणी परवा रात्री तिथे आकाश पाळण्यात बसण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत मी माझ्या घरच्या गार्डला पाठवले होते. कारण मी इथे नसल्यामुळे ती मला विचारुन गेली. गार्ड आणि माझ्याकडे काम करणारे 2-3 मुलं तिच्यासोबत गेले होते. मुक्ताईनगरमध्ये काही मुलं आहेत, जे नेहमी वॉन्टेडमध्ये आहेत. ज्यांच्याकडून याआधीही असे प्रकार झाले आहेत. त्या मुलांनी पाळण्यात बसताना माझ्या मुलीला धक्काबुक्की केली, त्यांचे व्हिडीओ देखील काढले आणि माझ्या गार्डला देखील त्यांनी धक्काबुक्की केली. त्याची कॉलर पकडली. प्रश्न एवढाच आहे की आज माझी मुलगी सेफ नाही तर बाकीच्या मुलींचा पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या मुलांची हिम्मत एवढी वाढलेली आहे की, मुलींच्या सोबत गार्ड असतानाही असे प्रकार मुक्ताईनगरमध्ये घडत आहेत. एक आई म्हणून माझं कर्तव्य आहे की या घटनेला न दाबता येथे पोलिस स्टेशनमध्ये येऊन मी तक्रार केली आहे. अशा प्रवृत्तींना पूर्णपणे ठेचलं पाहिजे. मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षकांकडे मी तक्रार दाखल केली आहे. कारवाईची माहिती घेतली आहे. परंतु अद्यापपर्यंत पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.’
रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला जावे लागले. संबंधित घटनेच्या कारवाईची माहिती मुक्ताईनगरच्या पोलिस निरीक्षकांनी खडसे यांना दिली आहे. रक्षा खडसे म्हणाल्या, ‘मी स्वतः पोलिसांशी बोललो आहे. हे लोक गुंड आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोरींचे त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्याचवेळी पोलिसांनी त्याला अडवलं होते. पण त्यांनी पोलिसांना देखील मारहाण केली. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पण ते जामिनावर सुटले. त्यांची इतकी हिंमत होते की ते पोलिसांना देखील मारहाण करातात. इतके गुंड याठिकाणी पसरलेले आहेत आणि इथे त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे संरक्षण आहे.’
एकनाथ खडसे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, हे दुर्दैव आहे. ‘राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यभरात अशा घटना वारंवार घडत आहेत. याआधी अशा अनेक घटना या परिसरात घडलेल्या आहेत. परंतु, मुली पोलिस स्टेशनला यायला घाबरतात. मुलींची सुरक्षितता ही फार अवघड बाब आहे. मी माझ्या नातीला सांगितलं की, तू स्वतः जाऊन तक्रार कर. आपण घाबरता कामा नये.’
राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय महिला नेत्याची हत्या; सुटकेसमध्ये मृतदेह…
स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा…
IT मॅनेजरनं Live Video करत छळाला कंटाळून संपवलं आयुष्य…
धक्कादायक! घटस्फोटीत जावयाने पत्नीवरचा राग काढला सासूवर; टेम्पोत बसवले अन् पुढे…
एका युवतीची लव्ह स्टोरी चांगलीच चर्चेत; Video मध्ये म्हटले की…

